Ticker

6/recent/ticker-posts

जिल्हा बँकेंतर्फ बुध येथे सहकार सप्ताह उत्साहात साजरा

 


    बुध दि . [प्रकाश राजेघाटगे ] 

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने खटाव तालुक्यातील बुध येथे सहकार सप्ताह उत्साहात  साजरा करण्यात आला . या कार्यक्रमाचे औचित्य साधून बुध येथील श्री नागनाथ विदयामंदिरात शिक्षक व विद्यार्थ्याना अनमोल मार्गदर्शन केले .   सहकार सप्ताह निमित्ताने श्री. नागनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यामंदिर बुध येथील विध्यार्थी यांना आपल्या बँकेविषयी विविध योजनेची माहिती देत असताना शाखेचे विकास अधिकारी श्री. मुकुंद लावंड  यांनी शेतीविषयक योजना, कर्ज परतफेडी बद्दल तसेच शैक्षणिक कर्ज योजने बाबत मार्गदर्शन करून विध्यार्थी यांनी आपल्या पालकांना याबाबत माहिती द्यावी असे आवाहन केले. तसेच खटाव तालुका समन्वयक श्री. अर्जुन भोसले  यांनी उपस्थित राहुन आपल्या बँकेतिल विविध डिजिटल बँकिंग सुविधा, प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, प्रधानमंत्री अन्न प्रक्रिया योजना, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना इत्यादी विषयी माहिती सांगून मार्गदर्शन करण्यात आले.

तसेच विध्यार्थीना नेहमी वारंवार समोर येत असलेली शंका डिजिटल अरेस्ट सायबर सिक्युरिटी, डिजिटल बँकिंग वापरताना घ्यावयाची दक्षता याबाबत सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा- बुध शाखेचे शाखाप्रमुख श्री. सुनिल शिरसाट यांनी मार्गदर्शन केले. विध्यार्थीना एटीएम, क्यूआर कोड, युपीआय, रुपे कार्ड केसीसी डेबिट कार्ड, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना व प्रधानमंत्री जीवनज्योति विमा पीक विमा याबाबत माहिती सांगण्यात आली. कार्यक्रमाप्रसंगी श्री. नागनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यामंदिर शाळेचे मुलांना चहा व नाष्टा देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या कार्यक्रमा बद्दल शाळेचे प्राचार्य श्री. अंकुश भांगरे , पर्यवेक्षक  श्री. नानासो दड्स , तसेच वर्गशिक्षक श्री. भगवान सरवदे  ह्यांनी आपल्या बँकेचे तसेच बुध शाखेचे आभार व्यक्त करण्यात आले. सप्ताह साजरा करणेकरिता श्री. अजय शिंदे रोखपाल व शाखेचे शिपाई सेवक श्री. शशिकांत लावंड व शाळेचे शिपाई सेवक गोविंद बोराटे  उपस्थित होते.