Ticker

6/recent/ticker-posts

आरोग्य केंद्रात दांडी मारणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचे वेतन कपात तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली माहिती .



 राजपाल बनसोड प्रतिनिधी दिग्रस 

दिग्रस : तालुक्यातील हरसुल प्राथमिक आरोग्य केंद्रात मागील अनेक महिन्यापासून अंदाधुंद कारभार सुरू असून एक महिन्यापूर्वी येथील वैद्यकीय अधिकारी ऋतुजा राठोड ह्या सतत तीन ते चार दिवस गैरहजर राहून रुग्णाच्या जीवाशी त्यांनी खेळलेला खेळ तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निदर्शनास येतास त्यांनी कारणे दाखवा नोटीस व चार दिवसाचे वेतन कपात केल्याचे सांगण्यात आले. शिवाय डीएचओ कार्यालय यवतमाळ यांचे कडे पत्र व्यवहार करण्यात आल्याचे सांगण्यात आले. हरसूल परिसरातील अनेक गावात लायगव्हाण, गांधीनगर, मोरखेड, आनंदवाडी तथा वरोली,कारखेडा, धानोरा, गादेगाव इतर आसपास खेड्यातील रुग्ण उपचारासाठी या प्राथमिक आरोग्य केंद्रात येत असतात.परिसरातील गरिबीचे अठरा विश्व दारीद्र जीवन जगणाऱ्या ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेच्या सुख सोयी करता शासनाने प्राथमिक आरोग्य केंद्राची निर्मिती केली. जेणेकरून प्रत्येक जनतेला आरोग्य विषयक सुविधा घेण्यास मदत होईल. याकरिता वैद्यकीय अधिकाऱ्यांची नेमणूक केलेली असून हरसुल येथील वैद्यकीय अधिकारी ऋतुजा सुनील राठोड ह्या मुख्यालयी न राहता यवतमाळ येथून ये जा करीत असल्यामुळे दररोज ओपीडी ची वेळ जरी 9 ते 12 व दुपारी 4 ते 530 पर्यंत असला तरी त्या सकाळी दहा वाजता आरोग्य केंद्रात पोहचतात. तर कधी दांडी मारतात. हाच विषय गावातील काही त्रस्त रुग्णांनी व त्यांचे नातेवाईकणी चव्हाट्यावर आणला. त्यावेळी तालुका आरोग्य अधिकारी आशिष पवार यांनी प्रत्यक्ष भेट दिली असता त्या गैरहजर आढळल्या त्यानंतर त्यांचेवर चार दिवसाचे वेतन कपात करण्याची कारवाई करण्यात आली. मात्र वैध्यकीय अधिकाऱ्यांची चोवीस तास सेवा पुरविण्याची जबाबदारी असतांना त्या जिल्ह्याचे ठिकाणाहून दररोज ये जा करीत असल्यामुळे रुग्णाचे हाल होत आहे.