प्रतिनिधी : विजय गायकवाड
रिसोड : येथील स्व.पुष्पादेवी पाटील कला व विज्ञान महाविद्यालय रसायनशास्त्र विभागाचे प्रा डॉ आदिनाथ डी बदर यांची महाराष्ट्र फेडरेशन ऑफ युनिव्हर्सिटी अँड कॉलेज टीचर्स ऑर्गनायझेशन (MFUCTO) या राष्ट्रीय पातळीवरच्या प्रतिष्ठित संघटनेच्या पुणे येथील झालेल्या बैठकीमध्ये सदस्यपदी एकमताने निवड करण्यात आली. या आधी प्रा डॉ आदिनाथ बदर हे या संघटनेचे विभागीय पातळीवरचे सक्रिय सदस्य होते. त्याप्रमाणे याआधी विद्यापीठाच्या वेगवेगळ्या महाविद्यालयीन समितीवर त्यांची नेमणूक झालेली असून ते नुकतेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक विद्यापीठाकडून हिवाळी परीक्षेसाठी त्यांची विद्यापीठाच्या भरारी पथकात समितीचे सदस्य म्हणून सुद्धा निवड झालेली होती. या MFUCTO संघटनेमध्ये झालेली निवड म्हणजे त्यांच्या महाविद्यालयीन स्तरावर संघटनेमध्ये राहून केलेल्या कामाची पावती होय व यापुढेही प्रा डॉ आदिनाथ बदर यांनी संघटनेसाठी अधिक जोमाने कार्य करत रहावे असे मत MFUCTO संघटनेचे अध्यक्ष प्रा डॉ प्रवीण रघुवंशी यांनी विचार व्यक्त केले. या त्यांच्या झालेल्या निवडीबद्दल स्व पुष्पादेवी पाटील कला व विज्ञान महाविद्यालय रिसोड येथे त्यांचा समाजशास्त्र विभाग प्रमुख प्रा डॉ रमेश मोरे व मुख्य लिपिक श्री संतोष शेरे यांच्यातर्फे शाल श्रीफळ व बुके देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी प्रा डॉ तनय गोडे, प्रा डॉ अमोल अढाव, प्रा डॉ जितेंद्र बोरसे, प्रा तुळशीराम भोयर, प्रा भूषण सावळे, प्रा डॉ अमरदीप जाधव, प्रा डॉ प्रकाश हणवते, प्रा डॉ प्रमोद फाटक, प्रा जयपाल खडसे, प्रा गोपाल कानडे, प्रा डॉ कु आम्रपाली भगत, श्री प्रकाश मोरे, प्रा डॉ विजय गायकवाड श्री गजानन बोरुडे, श्री एकनाथ खिराडे, श्री जगदीश बोडखे हे सर्व प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.





Social Plugin