गुणवंत राठोड कारंजा लाड प्रतिनिधी
कारंजा तालुक्यातील जानोरी या पावन भूमीत संत परंपरेची अखंड ज्योत तेवत ठेवत संत सहुरू भिसंगसिंग महाराज यांच्या वार्षिक पुण्यतिथी निमित्त अखंड हरिनाम सप्ताह व विविध धार्मिक कार्यक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले आहे, दिनांक १४ मार्च २०२६ ते २० मार्च २०२६ या कालावधीत भक्तिमय वातावरणात सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून, संपूर्ण आठवडा गावात हरिनामाच्या गजराने आणि कीर्तन भजनांच्या स्वरांनी परिसर दुमदुमून जाणार आहे. सप्ताहाच्या प्रारंभी १४ मार्च रोजी संत सद्गुरू भिसंगसिंग महाराज भजनी मंडळ यांचा संगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हरिपाठ मंडळ रोजची सेवा तबला व मुदुंगाचार्य गजानन शेळके आर्गन व पेटी वादक भोलेनाथ सावळे रा.काजळेश्वर गायनाचार्य गोपाल महाराज घेबड रा. शिवनी रमेश इंगळे रा. बोरी अरब वीणावादक किशोर महाराज इंगोले रा. अडगावमाऊली विवेकजी हत्तीमारे यांचे . भिसांगसिग महाराज हरिपाठ मंडळत्याच दिवशी रात्री ८ वाजता भजनी मंडळ व संगीत संचाचा विशेष कार्यक्रम पार पडणार असून भक्तांना भक्तिरसाचा अनोखा आनंद अनुभवता येणार आहे.
सप्ताहादरम्यान दररोज नामसंकीर्तन आणि कीर्तनांची मालिका रंगणार आहे. १५ मार्च रोजी हरिभक्त परायण पडोळे महाराज (निंबी) यांचे कीर्तन, १६ मार्च रोजी हरिभक्त ज्ञानेश्वर महाराज पाटील (खालखुली) यांचे कीर्तन, १७ मार्च रोजी हरिभक्त परायण एकनाथ महाराज भिंगारे (जानोरी) यांचे कीर्तन, महाराज १८ मार्च रोजी हरिभक्त सुरेश वाकडे (पोफाडीकर) यांचे कीर्तन, १९ मार्च रोजी हरिभक्त वैष्णवी ताई गवळी यांचे कीर्तन, तर २० मार्च रोजी हरिभक्त रामदास महाराज अवताडे (वालई) यांचे प्रसिद्ध भारूड सादर होणार आहे. या कीर्तन-भारुडांच्या माध्यमातून संतविचार आणि भक्तीचा संदेश जनमानसात पोहोचणार आहे. महोत्सवाची सांगता शनिवार, २१ मार्च २०२६ रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांनी होणार आहे. सकाळी ८.३० वाजता गावातून श्रींची ग्रामप्रदक्षिणा, त्यानंतर दुपारी रथयात्रा, तसेच दुपारी १२ वाजता दहीहंडी असा उत्साहपूर्ण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या सोहळ्यात काकडा प्रकाश लुंगे, भाऊराव मानकर, गुलाबराव दोनोडे, संजय पाटील भिंगारे यांच्यासह अनेक भक्त व ग्रामस्थ सहभागी होणार आहेत. त्याच दिवशी दहीहंडी व सत्कार समारंभ देखील पार पडणार आहे. संपूर्ण सप्ताह काळात दररोज विविध धार्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पहाटे ५ ते ६ काकड आरती, त्यानंतर ६ ते ७ ग्रामस्वच्छता, सकाळी १० ते १२ व दुपारी १२ ते ३ भागवत कथा, सायंकाळी ६ ते ७हरिपाठ, तर रात्री ८.३० ते १०.३० हरिकीर्तन अशा भक्तिमय कार्यक्रमांची मालिका पार पडणार आहे. या हरिपाठासाठी
सुभाष मुळे व मंडळी विशेष सहकार्य करत आहेत. जानोरी गावातील ग्रामस्थ, भाविक व भजनी मंडळांच्या सहकायाने हा धार्मिक सोहळा अत्यंत उत्साहात पार पडत असून, या सप्ताहामुळे गावात भक्ती, श्रद्धा आणि सामाजिक ऐक्याचे वातावरण निर्माण झाले आहे. संतांच्या विचारांनी प्रेरित हा महोत्सव गावकऱ्यांसाठी आध्यात्मिक उजेंचा स्रोत ठरत आहे, अशी माहिती जानोरी गावकरी व भक्त मंडळांनी दिली आहे.





Social Plugin