सेनगाव (9 मार्च 2026 सेनगाव)
न्याय मिळाला नाही तर उपोषण! प्रशासनाच्या उदासीनतीविरुद्ध अनिश्चित काळासाठी लढा सेनगाव येथील प्रलंबित प्रश्नाबाबत प्रशासनाने अनेकदा आश्वासन दिले, पण प्रत्यक्षात कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे आज सोमवार, 9 मार्च 2026 पासून तहसीलदार कार्यालयासमोर निश्चित काळासाठी उपोषण व आंदोलन सुरू करण्यात आले आहे. आश्वासन देऊन वेळ मारून नेण्यासाठी प्रशासनाची सवय आता चालणार नाही नागरिकाच्या हक्काच्या प्रश्नावर वारंवार दुर्लक्ष केले जात असल्याने आज पुन्हा आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागला. आज आंदोलनाचा पहिला दिवस आहे आणि न्यायनियेपर्यंत हा लढा थांबणार नाही.
प्रमुख मागण्या:
सेनगाव नगरपंचायतीने वरिष्ठ पत्रववहारानुसार 5400 चौरस फूट मोकळी जागा व तीस फूट रस्ता अधिक गृहीत करावा. सत्यनारायण तिवारी यांचे पुत्र संदेश, सचिन आणि स्वप्निल यांच्या विक्री करार क्रमांक.2290/13 वर आधारित नमुना क्रमांक 8 मधील बोगस नोंद तात्काळ रद्द करावी. रामकिसन कडूजी कोटकर यांच्या ठिकाणापासून गणेशराव जारे यांच्या टी पॉइंट पर्यंत सक्रिय नाला तातडीने स्वच्छ करावा. जनतेच्या हक्काच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण व आंदोलन सुरूच राहील. न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच, आता फक्त आश्वासन नाही, कर ठोस निर्णय हवा असे गणेश राव तुकाराम जी जारे पाटील यांनी सांगितले





Social Plugin