Ticker

6/recent/ticker-posts

प्रा. पल्लवी रमेशराव देशमुख यांना पीएच.डी.प्रदान



प्रतिनिधी :    विजय गायकवाड

रिसोड :  स्व.पुष्पादेवी पाटील कला व विज्ञान महाविद्यालय रिसोड महाविद्यालयातील  प्रा.कु. पल्लवी रमेशराव देशमुख यांनी गृह-अर्थशास्त्र या विषयामध्ये  पीएच.डी. पदवी यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे. व त्याचे औचित्य साधून महाविद्यालयाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.सत्कार प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.बाबारावजी पाटील संस्थेचे सचिव मा.श्री.अमितभाउ पाटील मा.श्री. सिद्धार्तजी खरात (आमदार,मेहकर-लोणार विधानसभा मतदार संघ तथा अधिसभा सदस्य, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ,अमरावती),मा.श्री.आशिषभाऊ रहाटे (उपजिल्हा प्रमुख,शिवसेना (उबाठा)सदस्य,जिल्हा परिषद,बुलढाणा)मा.डॉ.श्री.जे.बी.देव्हडे (कार्यकारी अधिकारी उ.शि.जीवन विकास शिक्षण संस्था),महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम.एन.गायकवाड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी,विद्यार्थी यांची बहुसंखेने उपस्थिती होती. त्यांच्या कार्याचे शैक्षणिक क्षेत्रात कौतुक होत आहे. त्यांच्या या यशाबद्दल कुटुंबीय, मित्रपरिवार तसेच सहकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे. भविष्यात संशोधन व अध्यापन क्षेत्रात अधिक प्रगती करण्याचा त्यांचा मानस असून समाजासाठी उपयुक्त असे कार्य करण्याची त्यांनी इच्छा व्यक्त केली आहे.