Ticker

6/recent/ticker-posts

कन्नड येथील जयकाली कॉम्पुटर टायपिंग इन्स्टिट्यूटला GCC -TBC परीक्षेत मोठे यश.

संपूर्ण निकालात मुलींचेच वर्चस्व 

यशवंत पवार कन्नड 

 महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे अंतर्गत घेण्यात आलेल्या कम्प्युटर टायपिंग GCC -TBC  परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून त्यात कन्नड येथील जयकाली कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूट या संस्थेचा जीसीसी टीबीसी 40 या विषयाचा निकाल 85 % लागला आहे.

 या परीक्षेत संस्थेच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली असून इंग्रजी-30 विषयात शितल काळे 93% ( प्रथम) मोनिका इंगळे 92 % ( द्वितीय) तर झरीना शेख हिने 91 % गुण मिळवून (तृतीय) क्रमांक मिळवला आहे.तसेच मराठी-30 विषयात शितल काळे 93.5% ( प्रथम ) रोजमीन शेख 84 % ( द्वितीय ) आणि झरीन शेख 81%(तृतीय ) आली आहे .इंग्रजी - 40 विषयात झरिन शेख 92.5% (प्रथम ) पायल माने 86% ( द्वितीय) तर देवेंद्र पवार 80 %  मिळवून ( तृतीय) आला आहे .झरीन शेख आणि रोजमीन शेख या दोघींनी चारही विषयात उज्वल यश संपादन केले आहे.

  तसेच रक्षक राठोड, मयंक देवकर. मयुरी शेजवळ,रुद्र चव्हाण, कृष्णा राठोड यांनी देखील ए , ए प्लस गुण मिळवून उज्वल यश संपादन केले आहे.  या यशामुळे त्यांचा शासकीय नोकरीत प्रवेश मिळणे सुलभ होणार आहे .

     त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ.यशवंत पवार तसेच कृष्णा इंटरनॅशनल स्कूलचे संचालक दिग्विजय पवार जयकाली कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूटच्या प्राचार्य सौ. अनिता पवार यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.