Ticker

6/recent/ticker-posts

ग्रामपंचायत धोत्रा भंनगोजी यांनी गावाच्या सुरक्षेसाठी लावलेल्या तिसरा डोळा कित्येक महिन्यापासून बंद! गावाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह?



मन्सूर शहा धोत्रा. भंनगोजी 

-ग्राम  धोत्रा. भंनगोजी , येथे गावाच्या सुरक्षेतेसाठी लाखो रुपये खर्च करून ग्रामपंचायतने सुरक्षेचे च्या दृष्टीने ग्रामपंचायत कार्यालय बस स्टँड परिसरात असल्यामुळे त्या इमारतवर सीसी कॅमेरे बसवले असून ते कॅमेरे कित्येक दिवसापासून बंद असून या बंद असलेल्या कालावधीत, गावात चोरीच्या घटना अगदी ग्रामपंचायतीच्या शेजारी झाल्या असून तसेच काही दिवसापूर्वी, बॅनर सुद्धा काही समाजकंटकांनी फाडले होते. अक्षरशा असे गंभीर प्रकार गावात होत असताना. या सी सी कॅमेरा ची दुरुस्ती ग्रामपंचायत ने आतापर्यंत केलेली नसून, या प्रकाराबाबत ग्रामपंचायत प्रशासनाची उदासीनता दिसत आहे. सुरक्षेच्या दृष्टीने भविष्यात येणाऱ्या प्रत्येक जातीधर्माच्या सण उत्सवा दरम्यान. काही अनुचित प्रकार होऊ नये. तसेच काही विघ्न संतोषी लोकांना संधी मिळू नये. याकरिता लवकरात लवकर ग्रामपंचायत प्रशासनाने कॅमेरे दुरुस्ती, व त्याची व्याप्ती वाढवण्यात यावी अशी गावकऱ्यांच्या वतीने, वेळोवेळी, सरपंच सचिव यांना, तोंडी माहिती देऊन अवगत करण्यात आले आहे. तरीपण आज पर्यंत कोणतीही व्यवस्था त्याबाबत ग्रामपंचायत ने केलेली नसून. आमच्या महाराष्ट्र ग्रामीण न्यूज च्या प्रतिनिधीने ग्रामविकास अधिकारी यांच्याशी चर्चा केली असता निधीचा अभाव असल्याचा कारण समोर आले आहे .

तरी हा गंभीर विषय असून ग्रामपंचायत प्रशासन वेळीच दक्षता व त्याचा निर्णय घेऊन गावातील तिसरा डोळा दुरुस्ती करावे हे गावकऱ्यांच्या वतीने ओरड होत आहे!