Ticker

6/recent/ticker-posts

अहिल्या नगर कल्याण राष्ट्रीय महामार्ग (NH-61) प्राधिकरण अभियंता अहिल्यानगर सारसनगर येथे निवेदन देत असताना श्री रविंद्र शेठ राजदेव.



पारनेर प्रतिनिधी. 

अहिल्या नगर-कल्याण राष्ट्रीय महामार्गावरील काँक्रीटीकरण कामातील निकृष्ट दर्जा, सुरक्षा उपाययोजनांची कमतरता आणि अपघाताची गंभीर बाब - तातडीने दखल घेण्याबाबत निवेदन.

माननीय अधिकारी महोदय,

मी रवींद्र राजदेव, निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने, पारनेर तालुक्यातील सावरगाव काळेवाडी परिसरातील ग्रामस्थांच्या वतीने हे निवेदन सादर करीत आहे. नगर-कल्याण राष्ट्रीय महामार्ग (NH-61) यावर सध्या सुरू असलेल्या काँक्रीटीकरणाच्या कामाबाबत खालील गंभीर तक्रारी नोंदवित आहे.

१. कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट असून, सावरगाव काळेवाडी परिसरात काँक्रीट टाकल्यानंतर लगेचच चिरा पडलेले दिसत आहेत. काँक्रीट टाकल्यानंतर पुरेसा पाणी पुरवठा (curing) न केल्याने दर्जा खालावला असून, रस्ता लवकरच खराब होण्याची शक्यता आहे. हे काम केंद्र व राज्य शासनाच्या हजारो कोटी रुपयांच्या खर्चाने होत असताना, दर्जाकडे पूर्ण दुर्लक्ष होत आहे.

२. कामादरम्यान ट्रॅफिक नियंत्रणासाठी कोणतेही गार्ड, सुरक्षा व्यवस्था, सूचना फलक किंवा दिवे लावलेले नाहीत. यामुळे अपघातांचा धोका प्रचंड वाढला आहे. नुकतेच काळेवाडी येथे निष्काळजीपणामुळे झालेल्या अपघातात एका युवकाचा मृत्यू झाला. ही अत्यंत दुर्दैवी घटना असून, यासाठी ठेकेदार व संबंधित यंत्रणेला जबाबदार धरले पाहिजे.

३. कामाच्या ठिकाणी कोणताही शासकीय अधिकारी (NHAI किंवा PWD) देखरेख करताना दिसत नाही. ठेकेदारांकडून केवळ 'शिकव' इंजिनियर्स उभे करून काम चालवले जात आहे. क्वालिटी कंट्रोलची कोणतीही व्यवस्था दिसत नाही.

४. स्थानिक ग्रामस्थ (सावरगाव, काळेवाडी, मानेवाडी, नांदूर पठार इ.) मोठ्या संख्येने या समस्येबाबत चिंतित आहेत. विकासाच्या नावाखाली सुरक्षा व दर्जाकडे दुर्लक्ष होऊ नये, ही मागणी आहे.

5.ज्या ठिकाणी माणसाने काम केलेले आहे त्या ठिकाणी दर्जा पाहून ते तोडण्यात यावे आणि पुन्हा नव्याने काम करण्यात यावे.

6.ज्या लोकांचे मृत्यू झाले आहेत त्या लोकांना तातडीने मदत करण्यात यावी. 7.तरी आठ दिवसात ह्या कामाची सखोल चौकशी करून कामाचा दर्जा सुधारला नाही आणि लोकांना नुकसान भरपाई मिळाली नाही तर पुढच्या हप्त्यात संपर्ण पंचवीस गावचे ग्रामपंचायत ठराव घेऊन नगर कल्याण हायवे वर रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी असा इशारा श्री रविंद्र शेठ राजदेव यांनी दिला आहे.