Ticker

6/recent/ticker-posts

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती उत्साहात साजरी..




दिनांक १९ एप्रिलपुर्णा प्रतिनिधी :-  

विश्वरत्न बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर   यांची 135 वी जयंती एरंडेश्वर येथे  उत्साहात साजरी करण्यात आली. या भीम जयंती महोत्सव निमित्त सर्व धर्म समभाव या उद्देशाने या वर्षीचा भीम जयंती सोहळा साजरा करण्यात आला.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन सकाळी दहा वाजून 30 मिनिटांनी  संपूर्ण जयंती पंचकमिटी यांच्या हस्ते पंचरंगी ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक  जयंती कमिटी मौजे एरंडेश्वर यांच्या पुढाकाराने ठिक  दुपारी  3 वाजता गावातील मुख्य रस्त्याने शांततापूर्ण वातावरणात मिरवणूक निघाली व ठीक ठिकाणी चौका चौकात विविध मान्यवरांच्या हस्ते बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले.