Ticker

6/recent/ticker-posts

पंचशील बौद्ध विहार खापा तुमसर येथे जनरल सभा संपन्न

 


यादवराव बुराडे : ग्रामीण प्रतिनिधी 

दिनांक 15 /4/2026 रोज - ला साय. 7:15 वा. बौद्ध विहार खापा, ता. तुमसर, जी. भंडारा येथे श्री. मा. शेषराव रविचंद गणवीर बौद्ध बांधव तथा (प्रहार दिव्यांग संघटना तुमसर तालुका प्रमुख) यांच्या मध्यस्थीने जनरल सभे चे आयोजन करण्यात आले. सर्व पदाधिकारी तसेच सर्व बौद्ध बांधव यांच्या उपस्थितीत बैठक सुरळीत पणे पार पडली. 

           बैठकीत खालील विषयावर चर्चा करण्यात आली....

1) बौद्ध विहार (सांभामंडम) बांधकाम करणे.

2) गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब यांची मूर्ती स्थानांतरित करणे व 

बांधकाम पूर्ण झाल्या नंतर दोन्ही मूर्ती नियोजित जागेवर स्थापना करणे.

4) कोणतीही तक्रार व वाद-विवाद न करता बौद्ध विहार (सभामंडप) बांधकाम पूर्ण करणे.

 वरील ठराव क्रं. 1 ते 4 सर्वानुमते मंजूर....करण्यात आला 

- प्रमुख उपस्थित - 

सौ. कीर्तिताई पिकलमुंडे सरपंच , हंसराज ठवकर उपसरपंच, राजकुमार माटे माजी सरपंच, उपसराव तीतिरमारे पोलीस पाटील, रतन ठवकर तंटामुक्ती अध्यक्ष, रोशन मने ग्रा. प. सदस्य, हंसराज वसानिक, दिनकर पिकलमुंडे माजी मुख्याध्यापक, राजेंद्र पिकलमुंडे सा. का., व्हचला कोल्हटकर मा. सदस्य,  राजेश डोंगरे मा. सदस्य, तसेच सर्व बौद्ध बांधव उपस्थित होते.सर्व बौद्ध बांधवाच्या वतीने शेषराव गणवीर प्रहार दिव्यांग संघटना तुमसर तालुका प्रमुख यांनी बैठकीचे आयोजन केले होते.