पाटण,( दिनकर वाईकर)
सालाबादप्रमाणे पाटणची ग्रामदेवता श्री लक्ष्मीदेवीचा यात्रा उत्सव शुक्रवार दि. 24 व शनिवार दि. 25 रोजी साजरा होत आहे. त्यानिमित्ताने विविध भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री लक्ष्मीदेवी यात्रा कमिटी व नगरपंचायत पाटण यांच्यावतीने करण्यात आले आहे.
शुक्रवार दि. 24 रोजी पहाटे विधीवत अभिषेक, धार्मिक पूजाविधी होत असून परंपरेप्रमाणे सायंकाळी 5 वाजता मंदिरापासून श्री लक्ष्मीदेवीचा छबिना-पालखी सोहळा नगरप्रदक्षिणेसाठी निघणार आहे. या छबिना-पालखी सोहळ्यात भारत म्युझिकल ब्रास बँड, मलकापूर, ता. कराड, राजे फॅन्सी बंगाळी, भव्य आतिषबाजी असे खास आकर्षण असून देवाचे अश्व तसेच पालखी सोहळा मार्गावर फटाक्यांची भव्य आतषबाजी करण्यात येणार आहे. छबिना-पालखी सोहळा मंदिरात आल्यानंतर रात्री 11 वाजता पाटण नगरपंचायत मैदान भाजी मंडई येथे ढोलकी वादक सागर मनवकर यांचा लोकनाट्य तमाशा, मनव कराड यांचा लोकनाट्य तमाशा मंडळाच्या बहारदार तमाशाचे आयोजन करण्यात आले आहे.
शनिवार दि. 25 रोजी सकाळी 10 वाजता येथील पाटण नगरपंचायत मैदान भाजी मंडई येथे लोकनाट्य तमाशा आणि दुपारी 3 वाजता श्री लक्ष्मीदेवी मंदिराच्या पाठीमागे जंगी कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले आहे. तरी यात्रेनिमित्ताने आयोजित विविध कार्यक्रमांचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री लक्ष्मीदेवी यात्रा कमिटी व नगरपंचायत पाटण यांच्यावतीने करण्यात आले आहे.
.jpg)




Social Plugin