Ticker

6/recent/ticker-posts

रांजणगांव येथे चैत्र पोर्णीमा निमित्ताने यात्रोच्छव


 रांजणगांवदेवी ( प्रतिनिधी) नेवासा तालुक्यातील श्रीक्षेत्र रांजणगांवदेवी येथे सालाबादप्रमाणे चैत्र शुद्ध पोर्णीमे निमित्राने ग्रामदैवत श्री देवी यात्रा भरते रांजणगांव येथे तुळजापूर निवासिनी तुळजाभवानी माहूरगडची रेणुकामाता कोल्हापूरची महालक्षीमी वणीची सप्तसृंगी अशी साडेतीन शक्तिपीठे उपलब्द आहेत त्या बरोबरच येथे राशिनची यमाईमाता चौढाळा येथील चौंडेश्वरी यांची देखील भव्यदिव्य अशी मंदिरे आहेत नवसाला पावणारी रांजणगांवची देवी अशीख्याती आहे जिल्ह्यातून वेगवेगळया ठिकाणाहून भाविक कुलस्वामीनीच्या दर्शनासाठी वर्षातून नवरात्रोत्सव व चैत्रपोर्णीमेला आवर्जुन कामातून वेळ काढून सहकुटूंब  येतात 
 रांजणगाव येथे नवरात्र उत्सवात ७व्या माळेला व चैत्र पोर्णिमेला दरवर्षी भव्यदिव अशी यात्रा भरते चैत्र पोर्णिमेच्या दिवशी गावातील व परीसरातील भाविक कावडीने गंगेवरून पाणी आणून गावातून वाजत गाजत कावडींची मिरवणूक करून ब्रम्हवृंदांच्या मंत्रोच्चारात देवीला जलाभिषेक केला जातो चैत्र पोर्णिमेची यात्रा दोन दिवस असते या मध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमाचे नियोजन केलेले असते सायंकाळी गावातून पालखीची मिरवणूक काढण्यात येते छबीना मिरवणूकीत पालखी समोर निरनिराळी पारंपारीक वाद्य वाजवून शोभेच्या दारूची आतिषबाजी केली जाते गावातून पालखी मिरवणूकी नंतर पालखी देवी मंदिरात नेऊन देवीसमोर भळंदाचा कार्यक्रम केला जातो 
 दुसऱ्या दिवशी सकाळी सर्व कलाकारांच्या हजेऱ्या होऊन त्यांना बिदागीचे वाटप केले जाते दुपारी घोडागाडी शर्यतीचे आयोजन केलेले असते या मध्ये परिसरातील शर्यत प्रेमी आपले घोडेबैल घेऊन शर्यतीसाठी उपस्थित असतात या शर्यतीत विजेत्यांना रोख बक्षिसांचे वाटप केले जाते यात्रेसाठी परिसातील वेगवेगळे व्यवसाईक  उपस्थित असतात या मध्ये हलवाई खेळणी कटलरी रहाट पाळणा सर्कस आदि बहुसंख्येने उपस्थित असतात भाविकांसाठी ग्रामस्था मार्फत निरनिराळ्या सोई सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत  देवस्थानचा  शासनाच्या क वर्ग योजनेत समावेश झालेला आहे त्यामुळे सोयी सुविधासाठी शासनाच्या निधीचा उपयोग करून घेतला जातो यात्रेच्या वेळेस गावातील सर्व समाज्याला वेगवेगळ्या कार्यासाठी मान असतो गावात रामनवमी हनुमान जयंती व चैत्र पोर्णीमा यात्रा उत्सव याचे औचित्य साधून संत सावता भजनी मंडळ व ग्रामस्थांच्या वतीने पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे परिसरातील सर्व भाविक वृंद व व्यवसाईक यांनी बहुसंख्येने येऊन यात्रेची शोभा वाढवावी अशी विनंती यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात येते.