Ticker

6/recent/ticker-posts

चिखली तालुक्यातील आगामी पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आढावा बैठक, महत्त्वाचे निर्णय व निर्देश:



मन्सूर शहा. धोत्रा. भंनगोजी. चिखली.:---

चिखली तालुक्यात येत्या दोन महिन्यांत पाणीटंचाई उद्भवू नये यासाठी आज श्रीराम नागरी पतसंस्थेचे जिजाऊ सभागृह, चिखली येथे 'चिखली तालुका पाणी टंचाई आढावा बैठक' घेऊन संबंधित विभागाचा आढावा घेतला व महत्त्वाचे निर्देश दिले.

काही ठिकाणी बोअर घ्यायची असेल तर ती व्यवस्था जीएसडी करून उपलब्ध करून दिली जाईल. एमएसईबी संदर्भात ज्या काही अडचणी असतील त्या दूर कराव्या. पाणी पुरवठा योजनेसंदर्भात सहकार्य करावे. जेणेकरून गावकऱ्यांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी. लाइन कट करू नये, जेणेकरून नागरिकांचा पाणी पुरवठा सुरळीत होईल याची दक्षता घ्यावी, अशा सूचना केल्या.

या वेळी पळसखेड जयंती, दिवठाणा, पेठ, बोरगाव वसू, साकेगाव, बोरगाव काकडे, मंगरुळ नवघरे, असोला नाईक, उत्रादा, आमखेड येथे विहीर अधिग्रहणाच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. मागील काही वर्षांत विहीर अधिग्रहणाचा निधी अजून मिळाला नाही. तो निधी येत्या आठ दिवसांत प्राप्त होणार असून आल्यावर तत्काळ वाटप करण्यात येईल, अशी माहिती दिली.

या बैठकीस गटविकास अधिकारी सर्वश्री समाधान वाघ, तहसीलदार विजय सवडे, उपजिल्हाधिकारी सौरभ गावंडे, नगराध्यक्ष पंडितदादा देशमुख, संजय गाडेकर जिल्हा उपाध्यक्ष भाजप, डॉ. कृष्णकुमार सपकाळ तालुका अध्यक्ष भाजप, संतोष काळे जिल्हाध्यक्ष भाजप युवा मोर्चा, नीरज गायकवाड तालुका अध्यक्ष युवा मोर्चा,  संतोष परिहार तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, अनिल चव्हाण उपकार्यकारी अभियंता पाणी पुरवठा चिखली, गजानन पोफळे सहायक गटविकास अधिकारी पंचायत समिती चिखली आदी उपस्थित होते.