Ticker

6/recent/ticker-posts

------------ कारंजा आगाराच्या वतीने वाहन परीक्षक प्रकाश बोरीकर यांचा केला सत्कार..!

 



*सोन्याचे दागिने एसटी कर्मचाऱ्यांनी केले परत:प्रामाणिकपणा जिवंत असल्याचा दिला पुरावा

डॉ गुणवंत राठोड कारंजा लाड प्रतिनिधी 

दिनांक 9/4/26 रोजी वाहक श्री के बी चव्हाण यांच्या बस मध्ये अकोला ते बोरगाव मंजू दरम्यान एक महिला प्रवासी प्रवास करीत असताना त्यांची सोन्याची पोत कारंजा आगाराच्या बस मध्ये पडली त्या बोरगाव मंजू येते उतरल्या परंतु त्या पाकिटामध्ये असलेली दहा ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र व म्हणी ते शीट च्या खाली पडले त्या महिला प्रवाशाला आपली पर्स खाली पडली हे माहिती नव्हती बोरगाव मंजू ते कारंजा पर्यंतप्रवाशी चढ-उतार करत असताना सुद्धा सदर पर्स कोणालाही दिसली नाही बोरगाव मंजू येथून एसटीचे कर्मचारी मनीष तिवारी यांनी कारंजा आगाराचे वाहक श्री कमल चव्हाणयांच्याशी संपर्क साधला तोपर्यंत बस आगारामध्ये जमा झाली होती परंतु कमल चव्हाण यांनी ताबडतोब वाहन परीक्षक श्री प्रकाश बोरीकर यांच्याशी संपर्क साधून त्यांनी त्या पोती बद्दल माहिती दिली व ती पर्स 59 09 या बस मध्ये पुन्हा पाहणी केली तेव्हा शीट खाली पर्स सापडली त्यामध्ये सोन्याचे डोरले व मनी असे एकूण दहा ग्रॅम सोने होते वाहन परीक्षक प्रकाश बोरीकर यांनी चव्हाण यांना फोन करून सांगितले की पर्स सापडली आहे व त्यामध्ये सर्व सामान व्यवस्थित आहे तेव्हा लगेच संबंधित मनीष तिवारी यांना फोन करून कमल चव्हाण यांनी सूचना दिली व दिनांक 10/4/26 रोजी सदर महिला ही पती व भावासोबत गाळ वस्तू घेण्याकरिता आल्या होत्या त्यांना कारंजा आगार व्यवस्थापक श्री हेमंत चांदुरकर यांनी ओळख पटवून सदर पर्स व सोने परत केले सदर पर्स सापडण्याकरिता वाहन परीक्षक प्रकाश बोरीकर यांच्या प्रामाणिकपणाबद्दलयाबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला कारंजा एसटी आगाराचे आगार व्यवस्थापक श्री हेमंत चांदुरकर यांनी सुद्धा बोरीकर यांचे कौतुक केले 

सदर महिला प्रवाशांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता त्याबद्दल त्यांनी कारंजा आगाराच्या सर्व कर्मचाऱ्यांचे पेढे वाटून आनंद व्यक्त केला.

आज ही प्रामाणिकपणा जिवंत असल्याचा पुरावा ह्यानिमित्याने अनुभवास आला.