Ticker

6/recent/ticker-posts

अज्ञात वाहनाच्या धडकेत कार चा भीषण अपघात काल चालक गंभीर जखमी तर त्यांची पत्नी किरकोळ जखमी.---

 

------अपघातात दीड वर्षाच बाळ सुखरूप  

 चॅनल क्रमांक 159 वरील घटना 

  नागपूर कॉरिडॉर वरील घटना

 डॉ गुणवंत राठोड कारंजा लाड प्रतिनिधी 

प्राप्त माहितीनुसार दिनांक 12/4/ 2026 सकाळी 8 सुमारास मुंबईवरून अमरावती साठी समृद्धी महामार्ग जात असताना लोकेशन क्रमांक 159 वर अज्ञात वाहनाच्या धडकेत कारचा भीषण अपघात होऊन त्यामध्ये कारचालक श्याम देशमुख वै 42 गंभीर तर त्यांची पत्नी जयश्री देशमुख वय 38 रा अमरावती या किरकोळ जखमी झाल्या अपघाताची माहिती मिळताच समृद्धी महामार्ग 108 रुग्णवाहिकेचे पायलट अतिश चव्हाण व डॉक्टर निलेश राठोड घटनास्थळी जाऊन जखमी रुग्णाला कारंजा उपजिल्हा रुग्णालयाचे दाखल केले. त्यावेळी तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ सागर मस्के यांनी प्रथम उपचार करून पुढील उपचारासाठी अमरावती रेफर केले. त्यावेळी मदत साठी कक्षा सेवक विजय शिरसाठ समृद्धी रुग्णवाहिकेचे अजय घोडेस्वार व श्री गुरु मंदिर रुग्णवाहिकेचे रुग्णसेवक रमेश देशमुख घटना त्यावेळी एचएसपी पोलीस दल व अग्निशामक दल समृद्धी महामार्ग कारंजा येथे प्रामुख्याने घटनास्थळी दाखल होते.