Ticker

6/recent/ticker-posts

डिजिटल मिडिया पत्रकार गजानन दांगटे यांच्या वाढदिवसानिमित्त लोह्यात थंडगार पाणपोई सुरू



लोहा 

संतोष चमकुरे (तालुका प्रतिनिधी )

सध्या तीव्र उन्हाळा सुरू झाला असुन लोहा तालुका सह परिसरात पिण्याच्या पाण्यासाठी धरपड चालू आहे.लोहा शहरात येणाऱ्या वाटसरूची तसेच प्रवाशांची आवक चांगल्या प्रमाणात असून लोहा शहर व परिसरात

सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर राहणारे आपला मराठवाडा डिजिटल न्यूज लाइव्ह चे संपादक गजानन दांगटे यांच्या समर्थ मल्टीसर्विसेस व आपला मराठवाडा डिजिटल न्यूज लाइव्ह तसेच बँक अधिकारी अमोल बालाजी चव्हाण ABC मित्र परिवार यांच्या विद्यमानाने लोहा शहरातील मध्यवर्ता ठिकाण असलेले पोलिस स्टेशन लोहा समोर "आम्ही लोहेकर" मोफत थंडगार फिल्टर पाणपोई चे उद्घाटन गुरुवर्य ह.भ. प. लक्ष्मीकांत महाराज लोहेकर यांच्या हस्ते करण्यात आले तर सदरील कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून लोहा नगरीचे नगराध्यक्ष शरद पाटील पवार उपनगराध्यक्ष करीम भाई शेख गटनेता भास्कर पाटील पवार लोहा पोलिस स्टेशन चे प्रतिनिधी म्हणून राठोड साहेब कांबळे साहेब नगरसेवक राजेश पाटील बोडके सामाजिक कार्यकर्ते दत्ता शेटे यांच्या सह लोहा चालक मालक ड्रायव्हर संघटना सर्व बांधव यांच्या उपस्थितीत पार पडला...

"जल हेच जीवन" म्हणत सद्या वाढत्या उन्हाची तीव्रता लक्षात घेता दरवर्षी प्रमाणे याही वर्षी आपला मराठवाडा डिजिटल न्यूज लाइव्ह चे संपादक गजानन दांगटे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत लोहा शहरात थंडगार मोफत फिल्टर पाणपोई चे आयोजन करण्यात आले असून सदरील चालू करण्यात आलेली मोफत थंडगार फिल्टर पाणपोई ही संपूर्ण उन्हाळा भर चालू ठेवण्यात येणार असून अनेक महामानवांच्या जयंती निमित्त पाण्याचे अधिक वेगळे नियोजन करण्यात येत असते.14 एप्रिल महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त शंभरहून अधिक थंडगार फिल्टर थंडगार पाणी झार चे नियोजन करण्यात येणार असून जयंती निमित्त शंभर झार चे नियोजन केल्या बद्दल डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव कमिटी लोहा सर्व कमिटी कडून विशेष आभार व्यक्त करण्यात आले आहेत....

या लोहा शहरात राबवण्यात आलेल्या आम्ही लोहेकर मोफत थंडगार फिल्टर पाणपोई चे सर्वच क्षेत्रातून कौतुक करण्यात येत आहे..