पाटण (दिनकर वाईकर)
पाटण शहरातील रस्ता रुंदीकरण कामासाठीच्या अडथळा होत असलेली पाटण शहरातील नवीन एसटी स्टँड समोरील असणारे खोक्यांचे झालेली अतिक्रमण गुरूवार दि, 9रोजी पोलिस बंदोबस्तात अखेर जेसीबीच्या साह्याने काढण्यात सुरुवात करण्यात आली विजापूर गुहागर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक इ 166 साठी कराड चिपळूण मार्गावरील पाटण शहरातील रस्ता रुंदीकरणाचे काम चालू आहे या कामासाठी धांडे फुल ।कालच पाडण्यात आला होता पाडलेल्या धांडे पुलाच्या शेजारीच जवळ असणाऱ्या पाटण नवीन बस स्थानकासमोरील ओढ्यावर अतिक्रमित असणाऱ्या दुकानासाठी खोके अतिक्रमित असणाऱ्या टपऱ्या आज अखेर प्रशासनाने हटवण्यास सुरुवात केली त्यामुळे नवीन पाटण बस स्थानक समोरील मोकळे होणार
रस्ता रुंदीकरणाच्या कामासाठी पाटण येथील बहुचर्चित धांडे पुल पाडण्याच्या हालचाली गतीमान झाल्यानंतर या पुलाच्या अगदी नजदीक आणि नवीन एसटी स्टँड समोरील ओढ्यावर बऱ्याच वर्षांपासून थाटलेली ४० ते ४५ टपऱ्या अतिक्रमणाचा विषय तेवढाच प्रशासनाने गांभीर्याने घेतला. गुरवारी सकाळी पोलिस फौजफाटा घेऊन अतिक्रमण काढण्यास प्रशासनाने सुरवात केल्यानंतर इतर टपरीधारकांनी स्वतः हुन अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली. रस्ता रुंदीकरण आणि प्रवासी वाहतूक सुरळीत राहण्यासाठी रस्त्याकडेला असणारी अतिक्रमण काढणे तेवढेच महत्त्वाचे मानून पाटण शहरातील रस्ता कामाला वेगाने सुरुवात करण्यात झाली आहे. रामापुर ते धांडे पुल हा रस्त्याचा पहिला टप्पा असून दुसऱ्या टप्प्यात धांडे पुल ते केरा पुल असा असणार आहे. हे काम पूर्ण होण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी लागणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
चौकट-
*पाटण येथील कराड - चिपळूण मार्गावरील धांडे पुल पाडल्यामुळे या मार्गावरील वाहतूक तात्पुरती इतरत्र वळविण्यात आली आहे. धांडे पुलाच्या ठिकाणी चार ते पाच दिवसांत वाहतुकीसाठी एक बाजू चालू करण्याचा प्रयत्न प्रशासनाचा आहे. यामुळे या मार्गावरील लहान वाहतूक सुरळीत चालू होईल असे सांगण्यात येत आहे. तोपर्यंत नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.*





Social Plugin