ग्रामीण प्रतिनिधी-
महमदरफी मदार आदमपूरकर
मुखेड तालुक्यातील ग्राम चांडोळा येथील बांगड्यांचे व्यावसायिक रहिमोद्दीन शेख यांचे चिरंजीव जमीर शेख यांनी अथक परिश्रम,जिद्द,चिकाटी आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर महाराष्ट्र शासनाच्या धर्मादाय आयुक्त कार्यालयामार्फत घेण्यात आलेल्या (गट-ब) परीक्षेमध्ये ईडबल्यूएस प्रवर्गातून राज्यात दुसरा क्रमांक पटकावत 'धर्मादाय निरीक्षक' पदाला गवसणी घातली आहे.
येथील बांगड्या व्यावसायिक रहिमोद्दीन शेख हे चांडोळा व परिसरातील गावागावांत बांगड्यांचा पारंपरिक वर्षानुवर्ष व्यवसाय चालवत आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आपल्या लेकरांनी उच्च शिक्षणाचा घेतलेला ध्यास त्यांनी अखेर साकार केला आहे.कुटुंबाची परिस्थिती हालाखीची होती.आपली मुले भविष्यात शासकीय कर्मचारी व्हावीत यासाठी त्यांनी अमाप कष्ट उपसत स्पर्धेतील मुलांना प्रोत्साहित करत राहिले.जमीरने ही वडीलांच्या कष्टाची जाण ठेवून अहोरात्र अभ्यास करीत धर्मादाय निरीक्षक पदाला यशस्वी गवसणी घातली.
या उत्तुंग यशाबद्दल मुखेड नगरीचे विद्यमान आमदार मा.डाॅ.तुषार राठोड, व्यंकटराव पाटील चांडोळकर, राम माधवराव पाटील, माजी पं.स.सदस्य शिवलिंग नाईक, चांडोळा बँक सहाय्यक महमदरफी मदार, सरपंच साहेबराव वाघमारे,गुंडेराव गायकवाड, व्यंकट गायकवाड, भारत सिंगनवाड गुरूजी,माचनवाड साहेब, मोदीन साहेब,पाशा मामा शेख,सलमान शेख,सादिक साहेब, सुलतान शेख,युनूस शेख, मिञपरिवार,प्रतिष्ठित गावकरी आदिंनी जमीरचे अभिनंदन केले आहे.





Social Plugin