ताडशिवणी सावित्रीबाई फुले नगर येथील दलित वस्तीच्या रस्त्याची अवैधरीत्या रेती माफिया चाळण स्थानिक तलाठी साहेब यांना संपर्क साधल्या असतात उडवा उडवी चे उत्तरे म्हणे कारवाईचे आदेश मला नाही कुठेतरी पाणी मुरतंय

 महाराष्ट्र ग्रामीण न्युज प्रतिनिधी 

महेंद्र खरात दि 09. 04. 2026. ‌.                                ‌‌.           ‌.  ‌.                ‌‌.  

स्थानिक ताड शिवणी येथील सावित्रीबाई फुले नगर दलित वस्तीच्या रस्त्याची अवैधरीत्यार रेती  माफिया कडून अक्षरशा चाळण तलाठी महोदयांना फोन करून सांगितले असता त्यांच्याकडून उडवा उडवी चे उत्तरे आले मला अधिकार नाही  कुठेतरी पाणी मुरतंय यात मात्र शंका नाही  सिंगल रोड असल्यामुळे बऱ्याच वेळेस रस्त्याच्या कडेला लहान मुले खेळत असतात रस्त्याच्या बाजूला दलित वस्ती असल्यामुळे अक्षरशः घरामध्ये जीवनामध्ये धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे तलाठी साहेबाकडे काय अधिकार आहे हे माननीय तहसीलदार साहेब सिनखेडराजा माननीय विभागीय अधिकारी खडसे साहेब आणि बुलढाणा जिल्ह्याचे नवनिर्वाचित कलेक्टर पाटील साहेब यांना ताड शिवणी दलित वस्तीच्या रस्त्याची पाहणी करून कठोर कारवाई करावी आणि ताबडतोब रस्ता दुरुस्तीचे काम करावे  आणि ताड शिवणी गावचे महसूल अधिकारी यांना यांच्या कर्तव्याची जाणीव करून द्यावी अशी आता गावकऱ्याकडून मागणी होत आहे देवखेडला घाट चालू आहे त्यांना रूम्हा मार्गे रस्ता दिलेला आहे पण अवैधरीत्या रिती उत्खनन ज्यांच्याकडे पावत्या नाही ते सरस ताड शिवणी मार्गाचा वापर करत आहे त्यांच्या पावत्या तपासून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करायचे आदेश प्रशासनाने तलाठी साहेबांना द्यावे अशी गावकऱ्यांकडून मागणी जोर धरत आहे आणि त्यांच्याकडे काय अधिकार आहेत त्यांना त्यांची जाणीव करून द्यावी अशी पण मागणी जोर धरत आहे