Ticker

6/recent/ticker-posts

आदर्श गाव निढळमध्ये श्री स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त धार्मिक सोहळा



बुध   दि. ८ [प्रकाश राजेघाटगे ] 

श्री स्वामी समर्थ श्रीपाद चॅरिटेबल ट्रस्ट, निढळ  ता. खटाव  यांच्यावतीने श्री स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त भव्य धार्मिक सोहळा आयोजित करण्यात आला आहे. बुधवार, दि. ८ एप्रिल ते बुधवार दि. १५ एप्रिल या कालावधीत अखंड नामजप, यज्ञ , पारायण सप्ताह, तसेच हवनयुक्त श्री गुरूचरित्र पारायण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.

या सप्ताहात दररोज सकाळी ७ वाजता नित्यस्वाहाकार , सकाळी ८ वाजता भूपाळी आरतीने कार्यक्रमाची सुरुवात होणार असून, नित्यसेवांमध्ये गुरूचरित्र वाचन, महानैवेद्य आरती,  विशेषयाग ,  औदुंबर प्रदक्षिणा , महानैवेद्य आरती ,  व विविध धार्मिक उपक्रमांचा समावेश आहे. सायंकाळी महाआरतीनंतर विविध विषयांवर मार्गदर्शन व भक्तिपूर्ण कार्यक्रम होणार आहेत.

सप्ताहातील प्रमुख कार्यक्रमांमध्ये दि. ८ रोजी ग्रामदैवत मानसन्मान व मंडल मांडणी, दि. ९ रोजी मंडल स्थापना, अग्निस्थापना व स्थापित देवता हवन, गुरूचरित्र वाचन , नित्य स्वाहाकार , दि. १० रोजी नित्य स्वाहाकार , श्री गणेश याग व मनोबल याग, दि. ११ रोजी चंडी याग, दि. १२ रोजी श्री स्वामी समर्थ याग, दि. १३ रोजी श्री गिताई याग, दि. १४ रोजी शिवरुद्र व मल्हारी  मार्तंड याग आणि दि. १५ रोजी बली पूर्णाहुतीसह सत्यदत्त पुजन अखंड नाम-जप -यज्ञ सप्ताहाची सांगता करण्यात येणार आहे. बुधवार दि. १५ रोजी सकाळी १० वाजता श्री स्वामी समर्थ पुण्यतिथीचा मुख्य सोहळा संपन्न होणार असून, या दिवशी विशेष पूजन, अखंड नामजप आणि यज्ञसांगता पार पडणार आहे. तसेच गुरूचरित्र ग्रंथ पारायणासाठी स्वतंत्र वेळापत्रक ठेवण्यात आले असून, सकाळ व सायंकाळी भाविकांना सेवा करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. हा कार्यक्रम श्री स्वामी समर्थ  सेवा केंद्र, निढळ(श्री हनुमान विदयालय शेजारी ), ता. खटाव  येथे होणार आहे.