टेंभुर्णी वा.
जाफ्राबाद तालुक्यातील भाविकांची गैरसोय लक्षात घेऊन तिर्थक्षेत्र असलेल्या शिर्डी राजुरेश्र्वर गणपती मातूतिर्थी राजमाता जिजाऊ जन्मस्थळ सिंदखेडराजा बस सेवा सुरू करून पर्यटक क्षेत्रातील माहिती मिळावी म्हणून निवेदन सादर.परिवह महामंडळ यांनी गाव तेथे लाल परी सुरुवात करावी म्हणून घोष वाक्य असलेल्या शब्दाना उजाळा द्यावा..जाफ्राबाद बस आगार होऊन पंचवीस वर्षे झाली . ओपनिंग च्या दरम्यान तिर्थक्षेत्र शिर्डी बस सेवा नियमितपणे सुरू झाली होती.
परंतू नवीन येत असलेल्या आगार प्रमुख यांनी ही बस सेवा बंद केल्याने भाविकांची श्रद्धा असलेल्या देवस्थानच्या बससेवा चालू करण्यात याव्यात म्हणून दि.८ एप्रिल रोजी मंहमंद बय्यास, ऋषीकेश पैठणकर, बाबासाहेब गव्हले, यांनी जाफ्राबाद आगार प्रमुख राजपूत ,साहाय्य आगार प्रमुख पंडित यांची भेट घेऊन एका निवेदनाद्रारे तिर्थक्षेत्र असलेल्या शिर्डी, तीर्थक्षेत्र राजुरेश्र्वर गणपती व राजमाता जिजाऊ जन्मस्थळ सिंदखेडराजा बस सेवा तातडीने सुरु करून भाविकांची होणारी गैरसोय दुर करावी. अशी मागणी दिलेल्या निवेदनात केली आहे. सदरील एक निवेदन परिवहनमंत्री महाराष्ट्र राज्य यांना सुध्दा ईमेलद्वारे करण्यात आली आहे. याकडे तातडीने कार्यवाही करण्यात यावी अशी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
या निवेदनावर मंहमंद बय्यास, बाळासाहेब गव्हले, ऋषीकेश पैठणकर , यांच्या सह अनेक भाविकांच्या सह्या आहे.





Social Plugin