ग्रामीण प्रतिनिधी-महमदरफी मदार आदमपूरकर
मुखेड तालुक्यातील ग्राम जाहूर येथील रहिवासी तथा महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा कुंडलवाडी, ता.बिलोली येथील कार्यरत कार्यालयीन सहाय्यक अरविंद धोंडीबा चौडेकर हे नियत वयोमानानुसार मंगळवार दि.३१ मार्च रोजी सेवानिवृत्त झाले आहेत.सपत्नीक त्यांचा निरोप सोहळ्यात गौरव करण्यात आला.
महाराष्ट्र ग्रामीण बँकेत तब्बल ४० वर्षाच्या प्रदीर्घ सेवाकाळात चौडेकर यांनी ग्राहकांप्रति कर्तव्यनिष्ठा,वेळेचे काटेकोर पालन, नम्र स्वभाव यामुळे सहकारी,अधिकारी तसेच ग्राहकांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण केले.
त्यांच्या कार्याचा गौरव करताना उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या सेवेला उजाळा दिला.जाहूर येथील शाखेतही चौडेकर दांपत्याचा यथोचित सत्कार करण्यात आला ,शाखा व्यवस्थापक मढके,सहाय्यक मनोज चौडेकर, चांडोळा सहाय्यक महमदरफी मदार,बीसी राहूल बोडके उपस्थित होते.यावेळी कुंडलवाडी शाखा व्यवस्थापक सौरभ खैरे,
सहाय्यक शाखा व्यवस्थापक तिरूपती बस्वदे,मुख्य रोखपाल नागभूषण ताडोड, बिलोली, कासराळी,लोहगांव शाखेतील अधिकारी,पाटील,पावणे,केरूरे बीसी विलास देगावे,सुहास देवकरे प्रतिष्ठित नागरिक,ग्राहक,कुटुंब आदिंची उपस्थिती होती.समारोप करताना अरविंदचौडेकर यांनी सेवाकाळात जेष्ठ अधिकारी यांचे मार्गदर्शन लाभल्याचे कृतज्ञतापूर्वक मान्य केले.





Social Plugin