Ticker

6/recent/ticker-posts

यात्रेत सापडलेली लाखो रुपयांची सोनसाखळी केली परत



बुध   दि . [प्रकाश राजेघाटगे ]

 खटाव तालुक्यातील  रणशिंगवाडीचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ माता जोगेश्वरी या जागृत देवस्थानची अष्टमीला यात्रा उत्साहात सुरू होती. या यात्रेनिमित्त निघालेल्या भैरवनाथ जोगेश्वरीच्या पालखीसमोर गावकरी, चाकरमानी, मुंबईकर नाच-गाणं आणि लेझीम खेळण्यात दंग होते. भक्तिमय वातावरणात भाविक जागोजागी पालखीचे दर्शन घेत होते.

बऱ्याच उशिराने मुंबई येथे ट्रेलरवर चालक म्हणून काम करत असलेल्या गावातील विठ्ठल बबन जाधव यांची लेझीम खेळताना दीड तोळ्याची सोन्याची चेन पडल्याची चर्चा सुरू झाली. ती गावातील गवंडी काम करणाऱ्या संतोष विलास यादव यांना सापडली.ज्यावेळी हा लाखो रुपयांचा दागिना सापडला, त्याच वेळी त्यांनी गावातील

काही प्रतिष्ठित लोकांना मला एक वस्तू सापडलेली आहे. ती कोणाची आहे ती चौकशी करा, जेणेकरून त्याच व्यक्तीला ते मिळावे, अशी भूमिका समजून सांगितली. थोड्याच वेळात चर्चा सुरू झाल्याने आणि खात्री झाल्याने गावकऱ्यांनी पालखीसमोरच ज्याची वस्तू गेली होती, त्याला ती परत केली. या प्रामाणिकपणाबद्दल गावकऱ्यांनी संतोष   विलास यादव  यांचे श्रीफळ देऊन कौतुक केले.