Ticker

6/recent/ticker-posts

रमेश भोंडवे यांचे निधन



बुध दि . [प्रकाश राजेघाटगे ]

 निढळ ता . खटाव येथील श्री रमेश फकिरा भोंडवे (माजी विस्तार अधिकारी,  पंचायतसमिती) यांचे  निढळ येथे अल्पशा आजाराने  व वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांनी बिकट परिस्थिती शिक्षण पूर्ण केले . कृषी शाळेत बोरगाव शिक्षण घेतले व  1975 साली समाजातील पहिली व्यक्ति म्हणुन  कृषी सहायक म्हणुन   रुजू झाले , त्यांनी ग्रामसेवक ते विस्तार अधिकारी या पदावर कराड, कोरेगाव, माण, या तालुक्यात दुर्गम भागात उत्कृष्ट काम केले . 2003 साली 35 वर्षे सेवा करून सेवानिवृत्त झाले होते . त्यांनी कौटुंबिक जबाबदारी पार पाडत असताना घरातील मोठे असल्याने आई वडील 5 भाऊ 4 बहीण यांची  जबाबदारी पार पडली, बचत गट स्थापन करणे याचा sakshamikarn केले, गावातील विविध विकास  कामात सहभागी होत असत तसेच त्यांनी त्यांचे वडील कै. फकिरा भोंडवे माजी जिल्हा परिषद सदस्य यांचे सामाजिक कामात सहभाग दिला,  समाजातील 42 घारे निर्माण करण्यासाठी त्यांनी खंबीर साथ दिली,  युवक यांना शिक्षण व सामाजिक स्तरावर मदत केली,  त्यांना त्यांची पत्नी गंगाबाई यांची साथ मिळाली मात्र त्यांचा जाण्याने ते एकटे झाले, त्यांच्या जाण्याने त्यांची कुटुंबात पोकळी निर्माण झाली ती कधीही भरून येऊ शकत नाही, सर्वाना मदत करणे,  मार्गदर्शन करणे हा त्यांचा स्वभाव होता. त्यांचा पाश्चात भाऊ, बहीण,  मुले, मुलगी , नातवंडे, परतूड असा परिवार आहे.