संतोष फुलारी @ ग्रामीण प्रतिनिधी,भेंडा बु //- 4 एप्रिल 2026
नेवासा तालुक्यातील तरवडी येथील प्रगतशील शेतकरी बारकू बाळाजी तुपे (वय ८६) यांचे दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, ग्रामस्थांमध्ये शोककळा पसरली आहे.
बारकू तुपे हे कष्टाळू व दूरदृष्टी असलेले शेतकरी म्हणून ओळखले जात होते. शेतीत नवनवीन प्रयोग करून त्यांनी आपल्या शेतात प्रगती साधली होती. नवनाथ व कुकाणा येथील माऊली फ्लॉवर दुकानचे मालक अरुण तुपे यांचे ते वडील होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली कुटुंबाने व्यवसाय व शेती या दोन्ही क्षेत्रांत प्रगती केली.
त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. कुटुंबप्रमुख म्हणून त्यांनी सर्वांना एकत्र ठेवत कुटुंबातील एकोपा जपला. त्यांच्या साध्या, प्रेमळ स्वभावामुळे गावातील सर्व स्तरातील लोकांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते.
त्यांच्या निधनाची बातमी समजताच नातेवाईक, मित्रपरिवार व ग्रामस्थांनी त्यांच्या निवासस्थानी धाव घेत श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्या अंत्यसंस्कारास मोठ्या संख्येने उपस्थित राहून ग्रामस्थांनी अंतिम निरोप दिला.
बारकू तुपे यांच्या निधनाने तरवडी परिसराने एक अनुभवी, मार्गदर्शक व्यक्तिमत्त्व गमावले असून, त्यांच्या आठवणी कायम जिवंत राहतील.
.jpg)




Social Plugin