Ticker

6/recent/ticker-posts

पेठ तालुक्यात काँग्रेस पक्ष्याची ,, संघटन सृजन अभियान,, निमित्त महत्वाची बैठक




दिनांक 12/04/26 वार रविवार

पेठ तालुका व शहर काँग्रेस कमिटी  संघटन सृजन अभियान 

नाशिक जिल्हा कॉग्रेस कमिटी उत्तर विभाग "संघटन सृजन अभियान" अंतर्गत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने देशभरात 'संघटन सृजन अभियान' हाती घेतले असून, महाराष्ट्रात हे अभियान पक्षाला तळागाळापर्यंत मजबूत करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.

यावेळी अखिल भारतीय काँग्रेसचे निरीक्षक शमिना शफीक, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीकडुन अभियानासाठी निरीक्षक माजी मंत्री पद्माकर वळवी, प्रदेश उपाध्यक्ष व जिल्हा प्रभारी ॲड.संदीप पाटील, प्रदेश उपाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे पाटील, शरदराव आहेर, प्रदेश सरचिटणीस युवराज करनकाळ, प्रदेश सचिव प्रा.ज्ञानेश्वर गायकवाड, नाशिक उत्तर विभाग जिल्हाध्यक्ष रमेश कहांडोळे, माजी आमदार काशीनाथ बहीरम, भाऊ चोधरी पेठ तालुका काँग्रेस अध्यक्ष,, बापू भाऊ भोये,, शांताराम वाघमारे,, सेवा दल अध्यक्ष पेठ तालुका,, भिका बाबा पाटील,, काँग्रेस चे जेष्ठ नेते,, विवेक चोधरी,, अध्यक्ष युवक काँग्रेस पेठ तालुका,, संजय भोये,, पेठ तालुका प्रमुख काँग्रेस,, नाशिक जिल्हा अध्यक्ष काँग्रेस सोशल मीडिया,,तसेच पेठ तालुक्यातील महिला तालुका अध्यक्ष सुद्धा उपस्थित होत्या,,यांच्यासह इतर मान्यवर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

महाराष्ट्र ग्रामीण न्युज : प्रतिनिधी : संजय भोये,, पेठ तालुका प्रतिनिधी