Ticker

6/recent/ticker-posts

खातगुण येथील सदिाक मुल्ला भारत की शान पुरस्काराने सन्मानित यांची भ्रष्टाचार विरोधी मंडळाच्या महाराष्ट्र राज्य सचिवपदी नियुक्ती



बुध  दि . [प्रकाश राजेघाटगे] 

खतगुण (ता. खटाव): खातगुण येथील रहिवासी सदिाक कमरुद्दीन मुल्ला यांची 'भ्रष्टाचार विरोधी मंडळ' (Anti Corruption Board) या संस्थेच्या महाराष्ट्र राज्य सचिवपदी (RTI Cell) नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या कार्याची दखल घेत भारतकी शान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

दिल्ली येथील कॉन्स्टिट्युशन क्लब ऑफ इंडिया (Constitution Club of India) येथे आयोजित एका दिमाखदार सोहळ्यात त्यांना 'भारत की शान' पुरस्कार देण्यात आला.  हा सोहळा उपभोक्ता एवं मानव अधिकार रक्षा समितीचा २४ वा वार्षिक दिवस, भ्रष्टाचार विरोधी मंडळाचा ५ वा वार्षिक दिवस, की लाईन टाइम्सचा ९ वा वार्षिक दिवस आणि युनिटी ऑफ प्रेस अँड मीडिया असोसिएशनचा १२ वा वार्षिक दिवस अशा संयुक्त निमित्ताने आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमाला देशातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. सदिाक मुल्ला यांना मिळालेल्या या नियुक्तीबद्दल आणि राष्ट्रीय स्तरावरील सन्मानाबद्दल खातगुण येतील विकास सेवा सोसायटीचे माजी चेअरमन विजय लावंड त्यांच्या या दैदिप्यमान कामगिरीबद्दल अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या. व या पुढील काळातही अशाच पद्धतीने कार्य करून गावचा तसेच तालुक्याचा नावलौकिक कायम ठेवावा असेही त्यांनी यावेळी सूचित केले. खातगुण परिसरातून आणि खटाव तालुक्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आगामी काळात भ्रष्टाचार निर्मूलन आणि माहिती अधिकाराच्या माध्यमातून समाजसेवा करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे.