
रणसिंगवाडीत १८०० पेंड्या खाक
बुध दि . [प्रकाश राजेघाटगे ]
रणसिंगवाडी ता . खटाव येथील शेतकरी उदय राजाराम घाडगे यांनी पशुधनाच्या चाऱ्यासाठी माळरानावर ज्वारीच्या कडब्याची गंज लावली होती. सोमवारी दुपारी दीडच्या सुमारास अचानक आग लागून ही संपूर्ण गंज खाक झाली. यामध्ये जवळपास १८०० पेंड्या कडबा जळाला असून, नुकसान झाले. सध्या टंचाईमुळे पशुधनाच्या चाऱ्याचे दर गगनाला भिडले आहेत.
कडब्याच्या एका पेंडीचा दर ५५ ते ६० रुपये असा आहे. कडब्याचे दर जास्त असल्याने पशुपालक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. शिवाय आता उन्हामध्ये वाढ आणि पाणीपातळीत घट झाल्याने ओल्या चाऱ्याचे उत्पादन घेणे शक्य नाही. त्यामुळे जनावरांसाठी आता कडबा हाच चारा आहे; पण अशा दुर्दैवी घटनेमुळे जनावरांच्या दावणीला काय टाकावे ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.




Social Plugin