आकाश रुमणे/नांदगाव खंडेश्वर दि.3-
हनुमान जन्मोत्सवानिमित्त यावर्षी प्रथमच नांदगाव शहरातून शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या शोभायात्रेने शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले. हनुमान जयंती उत्सव समितीच्या वतीने शहराच्या इतिहासात प्रथमच शोभायात्रा काढण्यात आली. स्थानिक गजानन महाराज मंदिरा पासून शोभायात्रा प्रारंभ झाली. यावेळी शोभा यात्रेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, भगवान हनुमंताची मूर्ती, प्रभू रामचंद्र व विठ्ठलाची मूर्ती, शिव पार्वती व नंदी इत्यादी विविध भव्य दिव्य मुर्त्यानी शहवासीयांचे लक्ष वेधून घेतले होते.
त्याचप्रमाणे गुरुदेव सेवा मंडळ चिखली येथील वारकरी दिंडीने नागरिकांच्या डोळ्याचे पारणे फेडले. महिला भजन मंडळ ढोल ताशे रोशनाई आतिषबाजी डीजे यांचा शोभा यात्रेमध्ये सहभाग होता. बस स्थानक परिसरात सामूहिक हनुमान चालीसाचे पठण करून शोभायात्रेची सांगता करण्यात आली. शोभा यात्रा शहरातून मार्ग क्रमण करीत असताना मुस्लिम युवकांनी सुद्धा हनुमान जन्मोत्सव शोभायात्रेचे स्वागत करून शरबत वाटप केले. त्यामुळे हिंदू मुस्लिम ऐक्याचा संदेश दिल्या गेला. नगराध्यक्षा प्राप्ती मारोटकर, उपनगराध्यक्ष अब्दुल जमीर, नगरपंचायत सभापती वासुदेव लोखंडे, कांता लोमटे, मोहम्मद रियाज नगरसेवक, प्रांजली गुल्हाने, मो. साजिद निलेश इखार, अमोल धवसे, गटनेता प्रकाश मारोटकर, राहुल गुल्हाने, आकाश लोमटे , जय राऊत, ऋषिकेश डकरे, आदित्य गुल्हाने, अक्षय मारोटकर इत्यादी युवकांनी परिश्रम घेतले.





Social Plugin