Ticker

6/recent/ticker-posts

स्व. पुष्पादेवी पाटील कला व विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थिनीचे IIT-JAM परीक्षेत यश



प्रतिनिधी : विजय गायकवाड

रिसोड: येथील स्व. पुष्पादेवी पाटील कला व विज्ञान महाविद्यालयातील बी.एस्सी. (विज्ञान शाखा) मधील विद्यार्थिनी कु. सानिका राऊत हिने भौतिकशास्त्र विषयात प्रतिष्ठित IIT-JAM (Indian Institute of Technology – Joint Admission Test for M.S. plus Ph.D.) प्रवेश परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण केली आहे. तिच्या या उल्लेखनीय यशामुळे महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल झाले आहे.

सानिका राऊत हिने सातत्यपूर्ण अभ्यास, प्रबळ इच्छाशक्ती आणि योग्य मार्गदर्शनाच्या जोरावर हे यश संपादन केले आहे. तिच्या या कामगिरीबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. श्री बाबारावजी पाटील, सचिव मा.अमित पाटील, माजी प्राच्यार्य तथा कार्यकारी अधिकारी डॉ. जे.बी.देव्हडे तसेच प्राचार्य डॉ. एम. एन.गायकवाड, भौतिकशास्त्र विभागप्रमुख डॉ. जितेंद्र बोरसे तसेच प्रा. श्री. निखिल उंबारकर, महाविद्यालयाचे  प्राध्यापकवर्ग यांनी तिचे अभिनंदन केले आहे.

तिच्या या यशामुळे इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळणार असून भविष्यातही ती उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. महाविद्यालय परिवारातर्फे कु. सानिका राऊत हिला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.