अंभई/ दत्ता पवार
सिल्लोड तालुक्यातील अंभई येथे रामानंद सांप्रदाय च्या वतीने गावात धान्य माधुकरी फेरी काढण्यात आली.
जग्दगुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी संस्थान नाणीजधाम च्या वतीने दर वर्षी एप्रिल महिन्यात धान्य माधुकरी अभियान राबविण्यात येते दरवर्षी गावातील घरोघरी जाऊन गुरुसाठी हि माधुकरी ( भिक्षा) मागण्यात येते.या माधुकरी अभियान भाविक देखिल मोठ्या उत्साहात सहभागी होऊन आपला मी पण बाजुला सारुन या सद्गुरू सेवेचे पुण्य आपल्या पदरी पाडून घेतात.गावात जमा केलेली माधुकरी मुख्य पिठ श्री श्रेत्र नाणिजधाम या ठिकाणी पाठविण्यात येते.त्या माधुकरी चा उपयोग मुख्य पिठासह अन्य पिठांवर भाविकांना मोफत महाप्रसाद देण्यासाठी करण्यात येतो.रामानंद सांप्रदाय तर्फे विविध उपक्रम राबविण्यात येते.जसे कि मरणोत्तर देहदान,रक्तदान,मोफत अम्बुलस सेवा,मोफत इंग्रजी माध्यमातून शिक्षण,मोफत वेदपाठशाळा,मोफत शिलाई मशीन वाटप,घरघंटी वाटप असे विविध उपक्रम रामांनद सांप्रदाय च्या माध्यमातून सामाजिकदृष्ट्या राबविले जातात.या मान्य माधुकरी फेरी साठी ज.न.म.प्रवचनकार, दत्ता पवार सेवा केंद्र अध्यक्ष,शेषराव काजळे,दिनकर दुतोंडे,रवी सोनवणे,रवी दांडगे, गणेश दुत्तोंडे,रमेश बावस्कर,रमेश सोनवणे,बंडू बावस्कर, संतोष दुत्तोंडे,भागुबाई जिते,अरूणा दुत्तोंडे, व रामानंद सांप्रदाय तील भक्त शिष्य साधक युवा संग्राम सेना आदी सहभागी होऊन परीश्रम घेतले





Social Plugin