Ticker

6/recent/ticker-posts

अंभई येथे क्रांतीसुर्य माहत्मा फुले जयंती उत्साहात साजरी



अंभई/दत्ता पवार 

क्रांतीसुर्य माहत्मा फुले हे लोकप्रिय,  महाराष्ट्रातील एक सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत,  समाजसुधारक आणि लेखक होते. सामाजिक प्रबोधन, अस्पृश्यता व स्त्रियांना शिक्षण देण्याचे कार्य त्यांनी कार्य केले. आज त्यांच्या जयंतीनिमित्त अंभई येथे भव्य रथ सजवुन त्या रथात माहात्मा फुले यांची प्रतिमा ठेऊन मिरवणूक काढण्यात आली.यात सर्व गावकर्यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन माहत्मा फुले यांना अभिवादन केले.  गावातील महिला भगिनींनी घरासमोर सुंदर सडा रांगोळी काढुन माहत्मा फुले यांच्या प्रतिमेची पुजा आरती करुन उत्साहात सहभागी झाल्या या वेळी  पोलीस पाटिल दगडु मैंद,मधुकर मैंद,मधुकर सोनवणे,शिवदास सोनवणे,सोपान मैंद,बबलू मैंद, बबलू जाधव,लक्ष्मण जिते, संतोष जिते, सखाराम जिते, राजेंद्र सोनवणे, अजय मैंद, गणेश भडके, गणपत मैंद, विलास सोनवणे, गणेश सोनवणे, पो.हे.काॅ.सांडु जाधव व पो.काॅ.संदिप जाधव अजिंठा पो.स्टे.यांनी चोख बंदोबस्त ठेवला.