Ticker

6/recent/ticker-posts

राष्ट्रवादी युवक काँग्रेसची मागणी



प्रतिनिधी नांदगाव खंडेश्वर/दि.21

खरीप हंगाम 2025-26 मध्ये नांदगांव खंडेश्वर तालुक्यात झालेली अतिवृष्टी व त्यामुळे झालेले सोयाबीन या मुख्य पिकाचे नुकसान लक्षात घेता तालुक्याला (नांदगांव खंडेश्वर) सरसकट पीकविमा संबधित कंपनीकडून देण्यात यावा. तसेच राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांनी फेब्रुवारी 2026 मध्ये केलेल्या घोषणेप्रमाणे राज्यात ज्या-ज्या भागात अतिवृष्टी झाली त्या-त्या भागात सरसकट हेक्टरी 17500/- प्रमाणे नुकसान भरपाई देण्यात येईल असे आश्वासन दिले त्या आश्वासनाला अनुसरून व नांदगांव खंडेश्वर तालुक्यातील झालेली अतिवृष्टीची आकडेवारी लक्षात घेता पीकविमा देण्यात यावा व शेतकऱ्यांना या आर्थिक संकटातून बाहेर काढावे अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षातर्फे तहसिलदार, नांदगांव खंडेश्वर यांना त्याठिकाणी निवेदनामार्फत करण्यात आली तसेच येत्या काळात या समस्यावर तोडगा न निघाल्यास शेतकऱ्यांकडून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.

निवेदन देतेवेळी तालुकाध्यक्ष मनोज गावंडे, हितेश शेळके, सर्वेश खेडकर, राजेंद्र सावदे, विलास बोबडे, सागर खेडकर, राजेंद्र भिमगडे, वैभव भोयर इत्यादी त्याठिकाणी उपस्थित होते.