स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेचा पाचव्या वर्धापन दिनाची नियोजन बैठक
प्रतिनिधी रविंद्र कावळे पाटील नाशिक
आज नगरेश्वर मंदिर, तुळजापूर वेस सोलापूर येथे स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दिपक कांबळे व संस्थापक व मुख्य महासचिव कमलेश शेवाळे व सर्व विश्वस्त व संचालक यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन बैठक अगदी उत्साहात आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. या बैठकीत एकुण १० समित्या स्थापन करण्यात आल्या. प्रत्येक समिती मध्ये सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक पदाधिकारी यांना स्थान देण्यात आले आहे. संघटनेच्या विश्वस्त तथा महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्षा सौ धनश्रीताई उत्पात यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन केले आणि वर्धापन दिन व राज्यस्तरीय मेळावा रविवार दि १७ मे २०२६ होईल असे जाहीर केले. या प्रसंगी विश्वस्त तथा महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्षा सौ धनश्रीताई उत्पात विश्वस्त तथा महाराष्ट्र राज्य प्रसिद्धी प्रमुख उमेश काशीकर, कोल्हापूर चे विश्वस्त तथा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस प्रशांत निकम, संचालक श्रीकांत देशपांडे, सोलापूर जिल्हाध्यक्ष चंद्रकांतजी वेदपाठक, पंढरपूर महिलाध्यक्षा शोभाताई बडवे, अक्कलकोट शहर अध्यक्ष श्रीमती मिराबाई बुद्रुक, नूतन जिल्हा प्रभारी स्मिता पाठक, जिल्हा कार्याध्यक्ष सुनिल पंडित, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्रकुमार रघोजी, सत्तू भोसले, जिल्हा सचिव सुधाकर शहाणे, सहसचिव दिपक कुरुलकर, सहसचिव दत्तगुरु वेदपाठक, लातूर जिल्हाध्यक्ष विजयकुमार पुष्कर दीक्षित, दक्षिण सोलापूर तालुकाध्यक्ष संतोष दीक्षित, ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष व मोडनिंब चे पत्रकार मारुती वाघ, लातूर चे भागवत पांचाळ, बंडू विजयकुमार भातलावांडे, निलंग्याचे मोहन पोतदार, मोडनिंब चे अमर शिंदे, संतोष वेदपाठक, जिल्हा कार्य. सदस्य दिलीप क्षीरसागर, संतोष पोतदार .स्थित होते.





Social Plugin