अंभई/ दत्ता पवार
अनंत श्री विभुषित जग्दगुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या सिध्द पादुकांचे भोकरदन नगरीत आगमन होत असुन भोकरदन नगरी या पादुकांच्या स्वागतासाठी सज्ज झालेली आहे.
जग्दगुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या सिध्द पादुका दरवर्षी जिल्हायात येतात ह्या वर्षी या पादुका भोकरदन शहरात येत असुन शहरात उत्साहाचे वातावरण आहे.गेल्या पंधरा दिवसांपासून स्वयंसेवक या पादुका दर्शन सोहळा साठी परीश्रम घेत असुन उद्या ती सोनेरी सकाळ भोकरदन वासियांना अनुभवता येणार आहे भोकरदन जालना रोडवरील कुभारी फाटा येथे भाविकांसाठी भव्य मंडप उभारला आहे. या ठिकाणी श्रींच्या सिद्ध पादुका वाजत गाजत या ठिकाणी येऊन त्या पादुकांवर शोडषौपचार पुजा विधी होऊन,भाविकांना गुरुपादुका पुजनाचा लाभ घेता येणार आहे तशी व्यवस्था देखिल करण्यात आली आहे.तसेच सामाजिक उपक्रम सुध्दा या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते राबविण्यात येणार आहे.तसेच भाविकांसाठी उपासक दिक्षा,बाल उपासक दिक्षा देखील होणार असून भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे उद्या दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन या ठिकाणी करण्यात आले असून रामानंद सांप्रदाय जालना च्या वतीने सर्व भाविकांना आग्रहाचे निमंत्रण देण्यात आले असून सर्वांनी या मह्नमंगल कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन रामांनंद सांप्रदाय च्या वतीने करण्यात आले आहे.





Social Plugin