आरिफ खान पठान महाराष्ट्र ग्रामीण न्यूज
सेमाडोह: आगामी राजकीय व सामाजिक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर 'सृजन संघटना अभियाना'ची मेळघाट विधानसभा मतदारसंघाची महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच सेमाडोह येथे पार पडली. या बैठकीत संघटनेच्या मजबुतीकरणावर आणि जनसंपर्कावर भर देण्यात आला.
या बैठकीला अभियानाचे निरीक्षक मा. श्री. आफताबजी अहमद यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच माजी मंत्री मा. श्री. संजयजी दुबे, अमरावती जिल्हा काँग्रेस कमिटी (ग्रामीण) चे जिल्हाध्यक्ष मा. श्री. बबलुभाऊ देशमुख आणि माजी आमदार मा. श्री. राजकुमार पटेल यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
यावेळी रामलाल काळे आणि ललिता बेठेकर यांचा काँग्रेस मध्ये पक्षप्रवेश झाला.या प्रसंगी व्यासपीठावर संजयजी खाडे, दयारामजी काळे यांच्यासह महेंद्र सिंह गेलवार, सहदेवराव बेलकर, राजेश सेमलकर, जहीर शेख, शेख मुक्तार भाई, रोहित पटेल, राहुल येवले, पीयूष मालवीय आणि परिसरातील बहुसंख्येने ग्रामस्थ व कार्यकर्ते उपस्थित होते.





Social Plugin