Ticker

6/recent/ticker-posts

जिल्हा परिषद शाळेत गॅस संपला; विद्यार्थ्यांचा 'पोषण आहार' टांगणीला!






पोंभुर्णा प्रतिनिधी,अमिन मेश्राम 

 पोंभुर्णा तालूका येतिल जिल्हा परिषद प्राथमिक वेळवा शाळेत गेल्या २० दिवसांपासून गॅस सिलिंडर संपल्यामुळे शालेय पोषण आहार शिजवण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. गॅसअभावी विद्यार्थ्यांना गरम ताजे अन्न मिळत नसल्याने पालकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे

शासनाच्या नियमानुसार, जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना दररोज सकस आणि गरम आहार दिला जातो. मात्र, जिल्हा परिषद शाळा वेळवा शाळेत गेल्या 20 दिवस, गॅस सिलिंडर उपलब्ध नाही. जुना सिलिंडर संपल्यानंतर नवीन सिलिंडर भरण्यासाठी सिलिंडर  नसल्याचे किंवा पुरवठादाराकडून विलंब होत असल्याचे समोर येत आहे.

चुलीवर स्वयंपाक करण्याची ओढताण

गॅस नसल्यामुळे काही ठिकाणी निकड म्हणून लाकडांचा वापर करून चुलीवर स्वयंपाक करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, पावसाळी वातावरण आणि ओल्या लाकडांमुळे धूर होऊन स्वयंपाकी महिलांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. तसेच, धुरामुळे वर्गातील विद्यार्थ्यांनाही त्रास सहन करावा लागत आहे.

"शाळेत मुलांच्या पोषण आहारासाठी गॅस असणे आवश्यक आहे. गॅसअभावी मुलांचे जेवण बंद राहणे किंवा त्यांना कोरडा खाऊ देणे हा त्यांच्या हक्कावर गदा आणण्यासारखे आहे. प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष द्यावे."

ख्याध्यापकांचे म्हणणे

या संदर्भात शाळेच्या मुख्याध्यापकांशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले की, "गॅस संपल्याबाबत संबंधित विभागाला आणि शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांना कल्पना दिली आहे. सिलिंडर उपलब्ध होताच किंवा सिलिंडरचा पुरवठा होताच आहार पूर्ववत सुरू होली

एकीकडे शासन 'डिजिटल शाळा' आणि 'प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र'च्या गप्पा मारत असताना, दुसरीकडे मूलभूत गरजेचा असलेला गॅस सिलिंडर शाळेत उपलब्ध नसावा, याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. वरिष्ठांनी या प्रकरणाची दखल घेऊन तातडीने सिलिंडर उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.