बुध दि . [प्रकाश राजेघाटगे ]
म्हासुर्णे, ता.खटाव येथील माजी सैनिक कै. काशिनाथ सुर्यवंशी यांच्या पत्नी श्रीमती लिला काशिनाथ सुर्यवंशी यांचे 2 एप्रिल 2026 रोजी दु;खद निधन झाले.
त्यांनी 15 वर्षांपूर्वी निधनानंतर स्वत:चे देहदान करावे असे ठरविले होते.त्यानुसार क्रांतीवीर नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथे त्यांच्या नातेवाईकांनी देहदानाची प्रक्रिया पुर्ण केली.त्यांच्या पश्चात त्यांचा मुलगा पुसेगाव येथील व्ही.के.इलेक्ट्रॉनिक्सचे संचालक विजयकुमार काशिनाथ सुर्यवंशी,त्यांची कन्या सुनिता संजय शिंदे, रेखा अरविंद जाधव तसेच सुना व नातवंडे असा परिवार आहे.त्यांच्या निधनाने म्हासुर्णे, खटाव व पुसेगाव परिसरात दु:ख व्यक्त केले जात आहे.





Social Plugin