बुध दि . [प्रकाश राजेघाटगे ]
शांतता व सलोखा गावामध्ये अबाधित रहावा, यासाठी सामाजिक राजकीय धार्मिक तेढ निर्माण होऊ नये अशी कृत्य कोणीही करू नये जेणेकरून आपले भविष्य खराब होऊ नये, आपल्या पालकांनी तरुणांच्याकडे लक्ष देऊन गावातील तरुणाचे भविष्य बरबाद होईल असे कुठलेही सामाजिक राजकीय धार्मिक तेढ निर्माण होणारे कृत्य होऊ देऊ नये. ही आपणा सर्वांची जबाबदारी असून गावामध्ये शांतता सलोखा राहावा आणि सर्व समाज गुण्या गोविंदाने एकत्र नांदावेत हीच खरी आजच्या काळाची गरज असून तरुणांनी सामाजिक व विधायक कामात लक्ष घालून समाजपयोगी कार्यासाठी तसेच आपल्या उज्वल भविष्यासाठी वेळ द्यावा असे आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर यांनी केले.
वर्धनगड तालुका खटाव येथे शांतता सलोखा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते .यावेळी ते बोलत होत्या. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती राजश्री तेरणी , पोलीस निरीक्षक जिल्हा विशेष शाखा श्री राजकुमार भुजबळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री संदीप पोमण , खटाव नायब तहसीलदार श्री गायकवाड यावेळी उपस्थित होते. अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर पुढे म्हणाल्या"कायदा सर्वांसाठी समान असून, कायद्यात सापडल्यास तो कोणालाही माफ करत नाही, जे कोणी चुकीचे कृत्य केले त्यांना सजा मिळाली असून त्यांना त्या यातना भोगावे लागणारच, पण त्यास अनुसरून तरुणांनी चुकीच्या कृत्य करून सामाजिक तेढ निर्माण होईल अशा घटना पासून दूर राहावे व आपले चांगले भविष्य घडवावे, असेही उपस्थित ग्रामस्थ व तरुणांना अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर यांनीआवाहन केले. यावेळी पोलीस उपविभागीय अधिकारी राजश्री तेरणी, जिल्हा विशेष शाखा पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमन, नायब तहसीलदार श्री गायकवाड यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. शांतता व सलोखा बैठक वर्धनगड गावामध्ये कायदा व सुव्यवस्था अनुषंगाने गावातील वातावरण शांततामय ठेवण्याचे आवाहनही करण्यात आले. यावेळी गावातील अनेक प्रमुख नागरिकांनी आपापली मते व्यक्त करून कुठल्याही प्रकारचा सामाजिक सलोखा व शांतता बिघडणार नाही याची ग्वाही दिली. सदर या सभेमध्ये 120 ते 150 सुजाण नागरिक उपस्थित होते.





Social Plugin