Ticker

6/recent/ticker-posts

गाव पुरळ खालची केळेये वाडी, गावाच्या वाड्यातील जाणाऱ्या डोंगर माथ्याचा रस्ता अपूर्ण अवस्थेत



 देवगड प्रतिनिधी अमोल शिर्के 

 गाव पुरळ खालची केळ ये वाडी येथील वाडीत जाणारा डोंगर माथ्याचा रस्ता अजून रखडलेल्या अवस्थेतील आहे याचे कारण अद्याप कळलेले गेलेले नाही. पीडब्ल्यूडी ग्रामपंचायत व प्रशासनाचे काही अधिकारी याला कारणीभूत आहेत. शिमगा उत्सवामध्ये हा रस्ता तोडण्यात आला अजून तो पूर्ण करण्यात आलेला नाही आहे त्याचे डांबरीकरण रखडलेल्या अवस्थेतील आहे त्याच्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्यांची अतिशय गैरसोय होत आहे त्यात शिवाय आजारी जे रुग्ण आहेत त्यांना नेण्याआण्याची सुद्धा गैरसोय होत आहे आंब्याची वाहतूक आहे शेतकऱ्यांना फार त्रास होत आहे ती सुद्धा आंब्याची वाहतूक बंद आहे. या कामात पीडब्ल्यूडी ग्रामपंचायतचे अधिकारी बेजबाबदारपणे या कामाकडे दुर्लक्ष पणा करत आहे तेव्हा प्रशासनाने त्यांच्यावर करडी नजर ठेवून रस्त्याचे काम ताबडतोब करण्यात यावे की जेणेकरून ग्रामस्थानांचे जाण्या येण्याचे हाल होणार नाही याची दखल घ्यावी. 

त्याशिवाय ज्याला हे काम दिलेले आहे तो कॉन्टॅक्टर सुद्धा ते जबाबदार पणे आपल्या अंगावरची कामाची जाणीव असताना सुद्धा टाळाटाळ करत आहे व हजार सभभी ग्रामस्थांना सांगत आहे असे दिसतात आलेले आहे. परिणामी लोकांना जाण्याची गैरसोय झालेली आहे व फार हाल होत आहे या रस्त्याकडे अत्यंत दुर्लक्षपणा केलेल्या गेलेला आहे. भाजपचे सरकार असताना सुद्धा तेथे निवडून आलेले पदाधिकारी सुद्धा या रस्त्याच्या कामात दुर्लक्ष पणा करताना दिसत आहे फक्त तोंडावर आश्वासन देतात की आज करतो उद्या करतो पण परिणामी रस्ता आहे तसेच आहे. तेव्हा  भाजप सरकारचे जे पदाधिकारी निवडून आले आहेत त्यांनी हा रस्ता ताबडतोब करण्यात घ्यावा व कॉन्ट्रॅक्टरला आदेश देऊन या कामाची अंमलबजावणी करण्यात यावी ही ग्रामस्थांची नम्र विनंती