प्रतिनिधी @ रामेश्वर तोंडे लोणी गवळी
मंगरूळ नवघरे : बुलडाणा जिल्हा परिषद , जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था बुलडाणा व उद्यम लर्निंग फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कौशल्य विकास सक्षम कार्यक्रमाच्या अंतर्गत संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय मेळाव्यात जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी अव्वल स्थानी आले असून कार्यक्रमाचे अध्यक्ष डायटचे प्राचार्य जगराम भटकर साहेब , बुलडाणा जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी अनिल आकाळ , जेष्ठ अधिव्याख्याता डॉ . समाधानजी डुकरे या मान्यवरांच्या हस्ते स्मृतीचिन्ह व प्रशिस्तीपत्र देऊन सहभागी विद्यार्थी व त्यांना मार्गदर्शन करणारे व्यवसाय शिक्षक पंढरी भिमराव रिंढे व कला शिक्षक रामेश्वर तोंडे यांना गौरविण्यात आले आहे.
असे महाविद्यालयाचे प्राचार्य वसंतराव गाडेकर गुरुजी यांनी एका प्रसिद्धी पत्रकाव्दारे कळविले आहे.
याबाबत सविस्तर असे की , महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे व उद्यम लिर्निंग फाऊंडेशन दिल्ली यांच्यातील सामंजस्य करारांतर्गत चालणाऱ्या सक्षम कार्यक्रमांतर्गत आपल्या जिल्ह्यातील चिखली , बुलडाणा व मोताळा या तीन तालुक्यातील काही निवडक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणा सोबतच २१ व्या शतकातील नवनवीन उद्योग कौशल्य आत्मसात व्हावी आणि आजचा विद्यार्थी उद्याचा निष्णात उद्योजक बनावा या उदात्त हेतूने उदयम लर्निंग फाऊंडेशन व्दारा उद्यमशिल मानसिकता व कौशल्य विकास सक्षम कार्यक्रमाचे प्रशिक्षण दिले जात आहे.
या कार्यक्रमांतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजने अंतर्गत जिल्ह्यातील सहभागी माध्यमिक ७२ शाळा व ७२ शिक्षकांचे प्रशिक्षण जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, बुलढाणा येथे माहे नोव्हेंबर मध्ये घेण्यात आले होते.
सदर प्रशिक्षणानंतर प्रशिक्षणार्थी शिक्षकांनी इयत्ता ९ वीच्या विद्यार्थ्यांना उद्यमशील मानसिकतेचे कौशल्य विकसित करण्यासाठी शालेय स्तरावर प्रशिक्षण देऊन वेगवेगळे उद्योग करण्यास प्रोत्साहीत केले असून
पीपल्स -प्रॉफीट - पॅनेल्स या 3P संकल्पनेवर आधारीत व्यावसायिक प्रकल्प तयार करण्यात आले.
यामध्ये प्रामुख्याने मोरिंगा पावडर , स्वादीष्ट चहा मसाला पावडर , कापडी पिशव्या तयार करणे , इमिटेशन ज्वेलरी, धूप अगरबत्ती, सुगंधित अगरबत्ती, परफ्यूम, टाकाऊ पासून टिकाऊ, केळी चिप्स, खाण्याचे चविष्ट पदार्थ विद्यार्थ्यांनी स्वतःच्या कल्पकतेतून तयार करून त्यावर आकर्षक लेबल लावून बुलडाणा येथे ७ एप्रिल २०२६ रोजी भरविण्यात आलेल्या प्रदर्शनीत मांडण्यात आली होती.
सदर जिल्हास्तरीय प्रदर्शनीत मंगरूळ नवघरे येथिल विद्यार्थ्यांनी जिल्ह्यातील टॉप सेव्हन स्कूल मध्ये अव्वल स्थान पटकावले असून प्रोजेक्ट बनविणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये इयत्ता 9 वीतील विद्यार्थिनी कु . संस्कृती महादेव वाकडे , कु . पायल दत्तात्रय येळवंडे , कु . वैष्णवी सतिश हरणे , कु . प्रतिक्षा प्रदिप जाधव , कु . योगीता लक्ष्मण शेजोळ , कु . अलीसबा सहेर शेख हबीब , कु. विद्या गणेश निकस, कु. पूनम रामेश्वर शेजोळ, कु. प्राची प्रकाश शेजोळ , कु. पायल रमेश आढाव, कु सृष्टी भागवत शेजोळ , कु. अक्षरा विष्णू गोजरे, कु . प्रतिक्षा शांतीराम शेजोळ , कु . श्रावणी नंदकिशोर सावंत , कु . गीता नारायण आंभोरे , कु . चैतन्या संदिप सोळंकी , कु . धनश्री अनंता येळवंडे , कु राधा गजानन पवार , कु. नुतन राजेंद्र हरणे , कु . वैष्णवी विनोद गोल्डे, कार्तिक निलेश दहातोंडे ,आर्यन शिवाजी घेवंदे ,आकाश संजय गाडे ,प्रणव प्रविन तांबट ,सार्थक सतिश तांबट ,ऋषिकेश कैलास घाटोळकर ,तेजस विजय शिंदे ,ओमकार मुरलीधर मुऱ्हेकर यांचा समावेश होता.
याप्रसंगी जिल्हास्तरीय मेळाव्याचे उद्घाटक जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य जगराम भटकर , प्रमुख अतिथी माध्यमिक शिक्षणाधिकारी अनिल आकाळ साहेब , प्रा . डॉ. समाधान डुकरे , मंगरुळ नवघरे येथिल जि . प . हायस्कूलचे प्राचार्य वसंतराव गाडेकर यांनी उपस्थित विद्यार्थी व शिक्षकांना मार्गदर्शन केले .
यावेळी महाराष्ट्र राज्य उद्यम प्रकल्प समन्वयक सचिन भांबोरे , जिल्हा समन्वयक प्रशांत पाटील , जनता विद्यालय पिंपळगांव सराईचे मुख्याध्यापक श्री .ठोंबरे सर , विनोद निंबोळकर, खंडेराव , पांचाळ व डायटचे सर्व अधिव्याख्याते , व्यावसायिक शिक्षक व विद्यार्थी _ विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
.jpg)




Social Plugin