Ticker

6/recent/ticker-posts

ललगुण केंद्रशाळेत रंगला स्नेहसंमेलनाचा आनंदोत्सव


                                                                                                           

बुध  दि . [प्रकाश राजेघाटगे ]

 नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणारी जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा ललगुण या शाळेत मंगळवारी स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.

विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना व्यासपीठ मिळावं या उद्देशाने आयोजित कार्यक्रमात पारंपारिक नृत्य, कोळीगीत ,फनी डान्स, लावणी ,साउथ इंडियन नृत्य , दशावतार , शाळा आमची अशा विविध कार्यक्रमांची रेलचेल होती. इयत्ता १ली ते ७वी तसेच अंगणवाडी या सर्व विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी   जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ . सौ . प्रियाताई शिदे  होत्या. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून  कृषी ,पशूसंवर्धन व दुग्ध शाळा समितीच्या सभापती लता कर्णे , खटाव  पंचायत समितीच्या सभापती वनिता दुबळे, उपसभापती  सौ. रेश्मा शेडगे ,  गटशिक्षणाधिकारी सोनाली विभुते ,  शिक्षणविस्तार अधिकारी शिवाजीराव कदम , केंद्रप्रमुख संजय दिडके  , सरपंच सौ पूजा भोसले  इत्यादी प्रमुख पाहुणे उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर सर्व मान्यवरांचे शालेय व्यवस्थापन समिती मार्फत स्वागत व सत्कार करण्यात आला. शाळेचे मुख्याध्यापक विष्णू पाचांगणे  यांनी प्रास्ताविक केले. 

त्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्षा सौ प्रियाताई शिंदे यांनी शालेय गुणवत्तेबाबत कौतुक केले. तसेच सर्वांना आरोग्य विषयी महत्वपूर्ण मार्गदर्शन केले. दूध भेसळ तसेच खाद्य तेलातील भेसळ याविषयी सविस्तर माहिती दिली. खाद्यातील कृत्रिम रंगांचा आरोग्यावर होणारा परिणाम समजावून सांगितला. घाण्याचे तेल वापरण्याचे फायदे समजावून सांगितले. त्यामुळे सर्व पालकांना तसेच विद्यार्थ्यांना संतुलित आहाराचे महत्त्व समजले.सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर प्रकारे आपली कला सादर केली.त्यानंतर वर्षभर विविध क्षेत्रात यश मिळवणाऱ्या गुणी विद्यार्थ्यांना तसेच शिक्षकांना व्यासपीठावर सन्मानित करण्यात आले. पालकांची उपस्थिती आणि विद्यार्थ्यांचे मनमोहक सादरीकरण यामुळे वातावरण अतिशय आनंदी झाले होते. या कार्यक्रमासाठी शालेय व्यवस्थापन समिती, ग्रामस्थ व पालक या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले.शिस्तबद्ध व नियोजनबद्ध कार्यक्रमाबद्दल तसेच शाळेच्या गुणवत्तेबद्दल सर्व ग्रामस्थांनी शाळेचे मुख्याध्यापक विष्णू  पाचांगणे , विश्वास चौधरी , सुनिल  मदने, गोफणे सर, कमलेश  पाटील  ,शुभांगी पवार , पुष्पा गोसावी  या सर्व शिक्षकांचे भरभरून कौतुक केले. श्री सुनिल मदने यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.श्री विश्वास चौधरी सर यांनी सर्वांचे आभार मानले.  कार्यक्रमाच्या शेवटी 'वंदेमातरम' गीताने या कार्यक्रमाची सांगता झाली.