दिनकर बोरकर
तळेगाव दाभाडे : येथील गो. नी. दांडेकर उद्यानातील ओपन जिममधील व्यायाम साहित्य गेल्या कित्येक दिवसांपासून नादुरुस्त अवस्थेत असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. उ
द्यानात नियमित व्यायामासाठी येणाऱ्या नागरिकांना या बिघडलेल्या साधनांमुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
स्थानिक रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, अनेक उपकरणे तुटलेली असून काही पूर्णपणे वापरण्यायोग्य राहिलेली नाहीत. त्यामुळे लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत शेकडो लोकं व्यायामाच्या सुविधांपासून वंचित राहत आहेत. काही ठिकाणी तुटलेल्या साहित्यामुळे अपघाताचा धोका देखील निर्माण झाला आहे.
नगर परिषदेकडे अनेकदा तक्रारी करूनही अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
तळेगाव दाभाडे नगर परिषद प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन नादुरुस्त व्यायाम साहित्य दुरुस्त करावे, तसेच उद्यानाची नियमित देखभाल करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.





Social Plugin