Ticker

6/recent/ticker-posts

डॉ. सुभाष आगाशे यांचे दातृत्व





बुध  दि [प्रकाश राजेघाटगे ]

 श्री सेवागिरी शिक्षण प्रसारक मंडळ पुसेगाव या आदर्श संस्थेचे विश्वस्त व प्रसिद्ध डॉक्टर, आध्यात्मिक लेखन करणारे तसेच प्रवचनकार डॉ . सुभाष आगाशे संस्थेच्या विविध उपक्रमाकरिता भरीव आर्थिक मदत करताना एक वेगळा आदर्श घालून दिला आहे.

 डॉ .आगाशे नेहमीच पुसेगाव  पंचक्रोशीतील विविध समाज उपयोगी उपक्रमात सहभागी असतात. सदरचा निधी हा संस्थेच्या विविध शैक्षणिक उपक्रमाकरिता व तसेच गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक मदतीकरिता उपयुक्त ठरेल डोळ्यासमोर ठेवून 

 नुकताच त्यांनी रुपये दोन लाख रुपयांचा धनादेश संस्था अध्यक्ष डॉ . सुरेशराव जाधव, उपाध्यक्ष बाळासाहेब जाधव, सचिव श्री मोहनराव जाधव, खजिनदार श्री लक्ष्मणराव जाधव तसेच सर्व संस्था पदाधिकाऱ्यांचे उपस्थित सुपूर्त केला. यावेळी यावेळी त्यांच्या या मदतीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.यावेळी संस्था विश्वस्त.श्री . सुभाषराव जगन्नाथराव जाधव, श्री.विष्णू कृष्णा खटावकर ,श्री .विश्वनाथ सखाराम जाधव , श्री.विलासराव जगन्नाथराव जाधव,श्री. योगेशराव हणमंतराव देशमुख ,श्री सूर्यकांत राजाराम जाधव ,संस्था सदस्य श्री जयंतराव सर्जेराव जाधव आणि विजयसिंह जयसिंगराव जाधव आदी मान्यवर उपस्थित होते .