Ticker

6/recent/ticker-posts

श्री हनुमानगिरी हायस्कूल गुरुकुल टेक्निकलचा 100% निकाल




बुध   दि . [प्रकाश राजेघाटगे ] 

श्री सेवागिरी शिक्षण प्रसारक मंडळ पुसेगाव संचलित श्री हनुमानगिरी हायस्कूल पुसेगाव या आदर्श विद्यालयाचा एस.एस.सी. मार्च 2026 परीक्षेचा निकाल नेत्रदीपक लागला असून गुरुकुल स्थापनेपासून ते आज अखेर 100% निकालाची परंपरा कायम राखली आहे.

 "मुख्यमंत्री माझी शाळा- सुंदर शाळा" अभियान टप्पा क्रमांक दोन अंतर्गत या शाळेने नुकताच खटाव तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरता झटणाऱ्या या शाळेत अनेक उपक्रम राबवले जातात.

 इयत्ता दहावी मार्च 2026 परीक्षेतील प्रथम तीन क्रमांकाचे मानकरी पुढील प्रमाणे 

1) कुमारी भक्ती प्रकाश ठोंबरे -97.20%

2) कुमारी सिद्धी अंकुशराव लवंगारे -95.60%

3) कुमारी प्रीती चंद्रकांत फडतरे-94.60%

 या शाळेच्या 12 विद्यार्थ्यांना 90% पेक्षा अधिक गुण प्राप्त झाले असून 60 विद्यार्थ्यांना 75% टक्के पेक्षा अधिक गुण प्राप्त झाले आहेत. गुरुकुल सेमी इंग्रजी टेक्निकल  विभागाचा 100% लागला असून शाळेचा 98. 31% निकाल लागला आहे.

 ग्रामीण भागात पालकांच्या विश्वासात पात्र ठरणाऱ्या या शाळेत संस्थेमार्फत विविध उपक्रम, व्याख्याने, चर्चासत्रि कार्यशाळा आयोजित करून  विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासास चालना दिली जाते.

  या दैदीप्यमान यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. श्री. सुरेशराव जाधव,उपाध्यक्ष श्री बाळासाहेब जाधव, सचिव श्री मोहनराव जाधव खजिनदार श्री लक्ष्मणराव जाधव, सर्व संस्था विश्वस्त व पदाधिकारी,तसेचविद्यार्थी गुणवत्ता वाढ प्रकल्प अधिकारी श्री के.डी. पवार सर, श्री. डी. पी. शिंदे सर,श्री. एस.आर. पाटील सर,श्री जयंतराव जाधव तसेच प्राचार्य श्री डी.एन.गोफणे पर्यवेक्षक श्री मोहनराव गुरव, व्होकेशनल विभाग प्रमुख प्रा. जे. बी.जाधव, सर्व सहकारी, पुसेगाव पुसेगाव पंचक्रोशी ग्रामस्थ, आजी-माजी विद्यार्थी संघ, विविध शालेय समिती पदाधिकारी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचाली करता शुभेच्छा दिल्या.