Ticker

6/recent/ticker-posts

अमळनेर संत सखाराम महाराजांचा रथोत्सव-2026 उत्साहात साजरा



अमळनेर :  संत सखाराम महाराज की जय घोषात सामाजिक ऐक्याचा बारा बलुतेदारांचा अमळनेरचा रथोत्सव उत्साहात सुरू झाला. अभय देव व आरती देव यांच्या हस्ते रथाची पूजा करण्यात आली. हभप प्रसाद महाराज यांच्या हस्ते विठ्ठल रुख्मिनी मंदिरात पूजा करून लालजींची मूर्ती रथावर आणण्यात आली.संत सखाराम महाराज यांचा मुखवटा व पादुका, विठ्ठल रुख्मिणी, ज्ञानेश्वर, मुक्ताई, तुकाराम महाराज आदीं संतांचे प्रतीक, गरुड आणि हनुमान, नगारखाना, घोडेस्वार, मशालधारी, भालदार चोपदार होते. 

ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत टाळकरी, वारकरींच्या ज्ञानोबा माऊली च्या घोषात रथ मिरवणूक उत्साहात काढण्यात आली. ह.भ.प. प्रसाद महाराजांच्या हस्ते विश्वस्त, पदाधिकारी, प्रतिष्टीत मान्यवर याना प्रसाद देण्यात आला. सुरुवातीला काही अंतर दोराने रथ ओढण्यात आला नंतर ट्रॅक्टर ने सुरुवात झाली. यावेळी आमदार अनिल पाटील, प्रांताधिकारी भंगाळे, डीवायएसपी कोते, तहसीलदार सुराणा, मुख्याधिकारी शिंदे ,पोलीस निरीक्षक निकम, नगराध्यक्ष डॉ. बाविस्कर, माजी नगराध्यक्ष विनोद पाटील, माजी नगराध्यक्ष  जयश्री पाटील, होमगार्ड समादेशक अरुण चौधरी. सकाळी रथ पूर्ववत जागेवर आणण्यात आला.