गुणवंत राठोड कारंजा लाड प्रतिनिधी
नागपूर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील मुरंबी फाट्याजवळ दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन पाच जण जखमी झाल्याची घटना गुरुवारी (दि. ८) रात्री आठ वाजताच्या सुमारास घडली. अपघातानंतर परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, पाच युवक लग्नकार्याकरिता एका दुचाकीवरून जात असताना समोरून येणाऱ्या दुचाकीची जोरदार धडक झाली. धडकेनंतर दोन्ही दुचाकीवरील प्रवासी रस्त्यावर फेकले गेले.
घटनेची माहिती मिळताच साबीर अली यांनी श्री गुरुमंदिर रुग्णवाहिकेचे रुग्णसेवक रमेश देशमुख यांना कळविले. त्यानंतर त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना कारंजा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तसेच कारंजा म्बुलन्सचे शिवम खोंड यांनीही मदतकार्य करत जखमींना रुग्णालयात पोहोचविले.
या अपघातात हनुमंत अनंत तिवारे (२०), करण अर्जुन नागाडे (२०), प्रदीप प्रीतम ठाकरे (१५), आकाश गणेश ढोंकळे (१७, सर्व रा. जालना शेलू, ता. मंगरूळपीर) तसेच गजानन भाटूसिंग जाधव (५०, रा. शेवती, ता. कारंजा) हे जखमी झाले. एका युवकाला किरकोळ दुखापत झाली असून सर्वांवर कारंजा उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. यापैकी काही जखमींना पुढील उपचारासाठी बाहेरगावी हलविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
.jpg)




Social Plugin