Ticker

6/recent/ticker-posts

शिवाजी ज्युनिअर कॉलेजमध्ये विज्ञान शाखेत साक्षी बागेकरी प्रथम



बुध  दि . [प्रकाश राजेघाटगे ] 

 महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या इयत्ता बारावीच्या परिक्षेत वडूज येथील छत्रपती शिवाजी ज्युनिअर कॉलेजमध्ये विज्ञान शाखेत बुधगावची सुकन्या  साक्षी शशिकांत बागेकरी हिने प्रथम क्रमांक पटकाविला . साक्षी ही  वडूज येथील दिवाणी न्यायालयात वरिष्ठ लिपीक शशिकांत बागेकरी यांची कन्या असून तिने या पूर्वी इयत्ता दहावी मध्ये सुद्धा उत्तम अभ्यास करून ९७.४०% मिळवले होते तर यावेळेस तिने सचोटीने अभ्यास करून विज्ञान शाखेत ८५% टक्के मार्क पडून छत्रपती शिवाजी ज्युनिअर कॉलेजमध्ये  प्रथम क्रमांक मिळवला . तिला ६०० पैकी ५१० मार्क मिळवली त्याच बरोबर  तिने अथक परिश्रम करून JEE या परीक्षेत सुद्धा ८६.६३ मिळवले आहेत. 

       साक्षी शशिकांत बागेकरी हिला वडूज मधील ए सी एफ अकॅडमीचे श्री शशिकांत मोरे सर यांचे  लाख मोलाचे मार्गदर्शन लाभले .तिने मिळवलेल्या यशाबद्दल वडूज जिल्हा न्यायाधीश श्री.काकतकर साहेब,श्री.कोल्हे साहेब सर्व न्यायालयीन अधिकारी, सर्व वकील मंडळी,शिवाजी संस्थेचे पदाधिकारी, मुख्याध्यापक व शिक्षक कर्मचारी व बुधचे ग्रामस्थ  यांनी तिचे अभिनंदन केले.