Ticker

6/recent/ticker-posts

सदृढ आरोग्याचा अतनुरात जागर ‘ माझं गाव आरोग्य संपन्न गाव ’ अभियानाला सुरुवात



अतनूर, जळकोट / प्रतिनिधी 

नागरिकांचे आरोग्यमान सुधारण्यासाठी शासनाने ‘ माझं गाव, आरोग्य संपन्न गाव ’ अभियान सुरू केले आहे. या अभियानाची अंमलबजावणी दि.१ मे महाराष्ट्र दिनाच्या दिवशी अतनुरात सुरूवात करण्यात आली आहे.

गावातील प्रत्येक नागरिकाला घराजवळच आरोग्यसेवा देणे, प्रतिबंधात्मक, प्रोत्साहनात्मक आरोग्यसेवा देणे, नागरिकांच्या जीवनशैलीत बदल घडवणे, आरोग्यसेवा केंद्रस्थानी ठेवून, लोकसहभागातून आरोग्यसेवा बळकट करणे हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून माझं गाव, आरोग्य संपन्न गाव हे अभियान शासनाने सुरू केले आहे. या अभियानात ग्रामपंचायत केंद्रबिंदू आहे.

याप्रसंगी प्राथमिक आ.केंद्र अतनूर येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.सकलेन शेख, डॉ.भक्ती कोळळे, आरोग्य सहाय्यिका प्रेमिला म्हेत्रे, आरोग्य सहायक बालाजी सोनटक्के, आरोग्य निरीक्षक शेख सलमान, फार्मसिस्ट गजानन तोंडारे, वरिष्ठ लिपीक रोखपाल पांडूरंग सूर्यवंशी, शासननियुक्त ग्राहक संरक्षण परिषदेचे अशासकीय सदस्य तथा दलितमित्र बालासाहेब गोविंदराव शिंदे अतनूरकर, आरोग्य मित्र बालासाहेब गोविंदराव शिंदे अतनूरकर, ग्राहक जनजागरण व मार्गदर्शन संस्थांचे संस्थापक राज्याध्यक्ष बी.जी.शिंदे अतनूरकर, जिजामाता महिला मंडळ अतनूरच्या अध्यक्षा सौ.संध्या बाळासाहेब शिंदे अतनूरकर, वसुंधरा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ.रुक्मीणबाई पांडुरंग सोमवंशी, ग्राहक संरक्षण परिषदेचे शासन नियुक्त अशासकीय सदस्य बालासाहेब गोविंदराव शिंदे अतनूरकर, ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्य व ग्राहक समिती महाराष्ट्र राज्यांचे प्रदेश संघटक बी.जी.शिंदे सर्व आरोग्य पर्यवेक्षिका, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सहाय्यिका, आरोग्य परिचारिका परिचर, सर्व आरोग्य कर्मचारी वृंद, परिचर ,सर्व गटप्रवर्तक व सर्व आशा कार्यकर्ती उपस्थित होते.

या अभियानाची अंमलबजावणी करण्यासाठी तालुका समिती स्थापन करण्यात आली आहे. गटविकास अधिकारी या समितीचे अध्यक्ष असून ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधिक्षक, बालविकास प्रकल्प अधिकारी, पाणीपुरवठा, तालुका विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, स्वयंसेवी संस्थेच्या प्रतिनिधींची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच ग्रामपंचायत पातळीवरदेखील कृती समितीची स्थापना करण्यात येणार आहे.